S M L

...पाहा तीन कुत्र्यांनी मिळून नागाला कसं ठार केलं ?

आजवर आपण सर्वांनी साप-मुंगसाचं हाडवैर ऐकलंय, कदाचित पाहिलंही असेल. एवढंच काय अनेक साप-मांजराचीही लढाही देखील तुम्ही पहिली आणि ऐकली असेल. जळगावात मात्र, चक्क कुत्र्यांनीच एक चपळ नागाचा खात्मा केलाय.

Chandrakant Funde | Updated On: Aug 24, 2017 01:06 PM IST

...पाहा तीन कुत्र्यांनी मिळून नागाला कसं ठार केलं ?

प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी

जळगाव 24 ऑगस्ट : आजवर आपण सर्वांनी साप-मुंगसाचं हाडवैर ऐकलंय, कदाचित पाहिलंही असेल. एवढंच काय अनेक साप-मांजराचीही लढाही देखील तुम्ही पहिली आणि ऐकली असेल. जळगावात मात्र, चक्क कुत्र्यांनीच एक चपळ नागाचा खात्मा केलाय. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथे भल्या सकाळी ही फाईट बघायला मिळाली.कजगावचे शेतकरी मांगीलाल जैन यांच्या शेतात कोब्रा जातीच्या नागाच दर्शन झालं. आणि उपस्थितांची भलतीच गाळण उडाली. या धावपळीतच पाळीव कुत्र्यापैकी एका कुत्र्याने नागाकडे पाहून भुंकणं सुरू केलं. हे भुंकण एकूण इतर दोन कुत्रे देखील त्याच्या मदतीला धावून आले. आणि तिथून पुढे खऱ्याअर्थाने ही लढाई सुरू झाली. या तिन्ही कुत्र्यांनी चोहोबोजूनी नागाला असं काही घेरलं की त्याची पळता भुई थोडी झाली.

तब्बल 15 ते 20 मिनिटे जीवन संघर्ष सुरू होता. अखेर थकलेल्या नागाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण कुत्र्यांनी तो हाणून पाडला. एक कुत्र्याने नागाचं लक्ष वेधयाचं आणि दुसऱ्याने नागाची शेपटी पकडायची अशी दुहेरी रणनिती अंमलात आणत कुत्र्यांनीच या नागाला चावा घेऊन आणि पंजे मारून पुरतं घायाळ केलं. तब्बल 25 मिनिटे हा जीवन संघर्ष सुरू होता. पण उपस्थितांपैकी एका माणसाने नागाच्या जवळ जाण्याची हिंमत दाखवली नाही. सरतेशेवटी 30व्या मिनिटाला हा नाग गतप्राण झाला. श्वानांच्या या शौर्याचं पंचक्रोशीत कौतुक होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2017 01:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close