'बुलेट ट्रेन नकोय,आधी लोकलसाठी सुविधा द्या', मुंबईकरांचा उद्रेक

मुंबईकरांचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत चाललाय. सरकार मात्र सुविधा देण्याऐवजी मुंबईकरांना बुलेट ट्रेनची स्वप्न दाखवतंय.

Sachin Salve | Updated On: Sep 29, 2017 11:37 PM IST

'बुलेट ट्रेन नकोय,आधी लोकलसाठी सुविधा द्या', मुंबईकरांचा उद्रेक

29 सप्टेंबर : मुंबईकरांचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत चाललाय. सरकार मात्र सुविधा देण्याऐवजी मुंबईकरांना बुलेट ट्रेनची स्वप्न दाखवतंय.

बुलेट ट्रेनची स्वप्न तुम्ही दाखवता, पण मुंबईकर मात्र किड्या मुंग्यांसारखे मरतायेत. मुंबईकर रेल्वेला सर्वात जास्त महसूल देतो. पण त्याच्या नशिबी हे असं चिरडून मरणं येतंय. मुंबईतलं कोणतंही स्टेशन घ्या... सकाळी आणि संध्याकाळी तुफान गर्दीतून वाट काढत फलाटावर जावं लागतं, लोकलमध्ये स्वतःला कोंबून घ्यावं लागतं. मग कधी मुंबईकर लोंबकळत प्रवास करताना खाली पडून मरतो, कधी अशा चेंगराचेंगरीत बळी जातो. हे कुठंतरी थांबायला हवं..

पोटापाण्यासाठी जवळपास प्रत्येक मुंबईकराला हे करावं लागतं. आमचा नाईलाज आहे. पण सरकार म्हणून तुम्हाला लाज वाटायला हवी. आम्ही सुविधांची भाकर मागतोय, तुम्ही बुलेट ट्रेनच्या केकचं मृगजळ मुबईकरांना दाखवता. द्यायचंच आहे तर मुंबईकरांना सुरक्षित प्रवासाची हमी द्या, नाही तर रेल्वे मंत्री म्हणून तुम्ही कारभार हाकायला अजिबात लायक नाही हेच खरं...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 29, 2017 08:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close