...'ही' चिमुरडी पहिल्यांदाच साजरी करतेय वडिलांसोबत दिवाळी,अशीही जवानांच्या घरची दिवाळी

...'ही' चिमुरडी पहिल्यांदाच साजरी करतेय वडिलांसोबत दिवाळी,अशीही जवानांच्या घरची दिवाळी

सातारा जिल्ह्यातील भोंदवडे गावचा सुपुत्र गणेश पवार हा तब्बल 13 वर्षांनंतर आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतोय.

  • Share this:

तुषार तपासे, सातारा

18 आॅक्टोबर : दीपावली म्हणजे अंधारकडून प्रकाशाकडे घेऊन जाणार सण... गरिबांपासून ते श्रीमंत सर्वच जण आपापल्या परीने हा सण साजरा करतात. फटाके वाजवून,गोडधोड खाऊन प्रत्येकाकडे दिवाळी साजरी केली जाते. मात्र डोळ्यात तेल घालून 12 महिने 24 तास देशाच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या आपल्या सैनिकांच्या घरी कशी केली जाते दीपावली साजरी हे जाणून घेण्याचा हा आमचा एक प्रयत्न.

बाप-लेकरायी ही भेट खूपच खास आहे...बापाच्या डोळ्यात आहे भरभरून प्रेम तर लेकराच्या डोळ्यात उत्सुकता...कारण ही चिमुकली सैनिक असलेल्या आपल्या बाबासोबत पहिल्यांदाच दिवाळी साजरी करतेय. सातारा जिल्ह्यातील भोंदवडे गावचा सुपुत्र गणेश पवार हा तब्बल 13 वर्षांनंतर आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतोय. सीमारेषेवर तैनात असलेल्या आपल्या सैनिक मुलाला,पतीला घरी आलेलं पाहून अख्ख घर आनंदानं भरून गेलंय.

देशाच्या सीमेवर गणेश पवार सारखे अनेक जवान डोळ्यात तेल घालून देशासाठी संरक्षण करत असतात, म्हणूनच आज आपण आपल्या घरी आनंदानं दिवाळी साजरी करतो.

आपल्या आनंदाबरोबर या जवानांचा त्याग आणि आहुती आपल्या स्मरणात राहू द्या आणि तुमच्या घरी एक पणती सीमेवर लढणाऱ्या शूर जवानांसाठी प्रकाशू द्या..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2017 01:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...