बळी'राजा'च !, दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्याने स्वखर्चाने 54 जोडप्यांचं लावलं लग्न

बळी'राजा'च !, दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्याने स्वखर्चाने 54 जोडप्यांचं लावलं लग्न

हट्टी पंचक्रोशीत दुष्काळामुळे अनेक उपवर तरुण-तरुणींची लग्नं रखडली होती. ही बाब लक्षात येताच इथल्या रामा वाघ या शेतकऱ्याने स्वखर्चाने 54 जोडप्यांचं लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात लावून दिलं.

  • Share this:

दीपक बोरसे, धुळे

26 एप्रिल : धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातल्या हट्टी पंचक्रोशीत दुष्काळामुळे अनेक उपवर तरुण-तरुणींची लग्नं रखडली होती. ही बाब लक्षात येताच इथल्या रामा वाघ या शेतकऱ्याने स्वखर्चाने 54 जोडप्यांचं लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यात लावून दिलं.

घोळक्यानं निघालेले हे नवरदेव.... आणि लग्नाच्या प्रतिक्षेत बसलेल्या नवऱ्या....हजारोंच्या संख्येनं वऱ्हाडी....शेतकऱ्यांच्या मुलांमुलींचा हा विवाह सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा होता. धुळे जिल्ह्यातल्या हट्टी गावातल्या रामा वाघ या शेतकऱ्याने स्वतःची पदरमोड करुन या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं. दुष्काळामुळे लग्न रखडलेल्या 54 जोडप्यांच्या अंगावर एकाच वेळी अक्षता पडल्या.

रामा वाघ यांनी हाती घेतलेल्या उपक्रमामुळे उपकृत झाल्याची भावना नवरदेवानं व्यक्त केलीये. तर लोकप्रतिनिधींनीही रामा वाघ यांच्या कामाचं कौतुक केलंय.

रामा वाघ यांची परिसरात रामाबाबा अशी ओळख आहे. 54 जोडप्यांचं लग्न लावून कन्यादान करून त्यांना मिळालेली रामाबाबा ही उपाधी त्यांनी सार्थ ठरवलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 09:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading