शेकापला घरघर!अलिबाग,पनवेलपुरताच उरला पक्ष

शेकापला घरघर!अलिबाग,पनवेलपुरताच उरला पक्ष

शेकापमधील शेतकरी आणि कामगार पक्षातून बाहेर पडला आणि हा पक्ष ठेकेदार आणि शेठ भूषवणाऱ्या नेत्याच्या दावणीला बांधला गेला.

  • Share this:

विनय म्हात्रे, 26 मे : पनवेल महापालिका निवडणूक भाजप व्यतिरिक्त सर्वच पक्षांना धक्कादायक ठरलीय. या निवडणुकीतून शेतकरी कामगार पक्षाच्या अस्तित्वालाच धक्का बसलाय. तर शिवसेना आपलं खात ना उघडू शकल्याने सेनेची या निवडणुकीत नाचक्की झालीय.

शेतकरी कामगार पक्ष म्हणजेच शेकाप. एक लढवय्या पक्ष. एक काळ होता शेकापचे दि. बा. पाटील, गणपतराव देशमुख, एन. डी. पाटील यांच्यासारख्या शेतकरी कष्टकरी नेत्यांनी राज्य हलवून सोडलं होतं. राज्याचं विरोधीपक्ष नेतेपदही शेकापने सक्षमपणे भूषवलं.अशा या शेकापमधील शेतकरी आणि कामगार पक्षातून बाहेर पडला आणि हा पक्ष  ठेकेदार आणि शेठ भूषवणाऱ्या नेत्याच्या दावणीला बांधला गेला. तिथेच शेकापला उतरती कळा लागली.

रायगड जिल्हा हा शेकापचा बालेकिल्ला मानला जायचा. हा हा म्हणता शेकापचे एक एक बुरुज ढासळत आता हा पक्ष फक्त अलिबाग तालुक्यापुरता उरलाय.

दुसरीकडे शिवसेनेची ही काही वेगळी परिस्थिती नाही. आज भाजपसोबतची झालेली युती तोडल्याने शिवसेनाच महापालिकेतून बाहेर फेकले गेली.

रायगड जिल्हा हा जरी ऐकेकाळी शेकापचा बालेकिल्ला असला तरी आता या जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांनी आपापले बालेकिल्ले तयार केलेत.आता पनवेल महापालिकेच्या निकालानंतर भाजप या सर्वच पक्षांच्या हातात असलेले तालुके स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करणार.

First published: May 26, 2017, 7:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading