घरात मांजर घुसलं म्हणून शेजाऱ्यांकडून मारहाणीत महिलेचा मृत्यू

घरात मांजर घुसलं म्हणून शेजाऱ्यांकडून मारहाणीत महिलेचा मृत्यू

मांजर घरात शिरल्याच्या कारणावरून, शेजारी राहणाऱ्या महिलेला मारहाण करत तीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे,पिंपरी चिंचवड

03 जुलै : मांजर घरात शिरल्याच्या कारणावरून, शेजारी राहणाऱ्या महिलेला मारहाण करत तीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. वरकरणी हा प्रकार केवळ एक घटना वाटत असली तरी, या घटनेमुळे समाजातील वाढत्या विकृत मानसिकतेच्या प्रश्नाला अधोरेखित केल आहे.

मांजरीवरुन सुरू झालेला वाद एखाद्याच्या जिवावरही बेतू शकतो. कधी विचारही मनात आला नसेलना. पण तसं घडलंय खरं.प्रभा रणपिसे यांची पाळीव माजर शेजारी राहणाऱ्या राजीव साळवे यांच्या घरात घुसली. शेजारच्याची घरात आलेली मांजर,साळवेंनी बाहेर फेकून दिली. आणि तिथून वाद सुरू झाला. मांजर का फेकली म्हणून प्रभा रणपिसेंनी जाब विचारला आणि मग प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. मारहाणीदरम्यान प्रभा रणपिसेंना हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलीये. कुठल्याही कारणावरुन हाणामारीवर उतरण्याची,मानसिकता का वाढतेय? मांजरीवरुन सुरू झालेला वाद प्रभा रणपिसेंच्या जिवावर बेतला. वाढता राग आणि खुंटलेला संवाद, सामाजिक स्वास्थ्य बिघडवतोय का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2017 07:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading