'ती' तो होता आणि 'तो' ती होती, लवकरच दोघांचं शुभमंगल सावधान !

कोणत्याही सिनेमाला शोभेल असा प्रसंग वाटत असला तरी तो सत्यात उतरतोय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2017 04:26 PM IST

'ती' तो होता आणि 'तो' ती होती, लवकरच दोघांचं शुभमंगल सावधान !

23 आॅगस्ट : एक मुलगी जी आधी मुलगा होती आणि एक मुलगा जो आधी मुलगी होता आता असे हे दोघे जण लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. कोणत्याही सिनेमाला शोभेल असा प्रसंग वाटत असला तरी तो सत्यात उतरतोय.

या प्रेमा कथेची सुरुवात झाली मुंबईतील एका सेक्स चेंज क्लिनिकमध्ये... 46 वर्षांचा आरव हा पहिले बिंदु अर्थांत मुलगी होता. आणि 22 वर्षांची सुकन्या ही पहिले मुलगा होती. 3 वर्षांपूर्वी या दोघांवर मुंबईतील  Genetic reassignment surgery (सेक्सचेंज) उपचार सुरू होता. त्यावेळी या दोघांची भेट झाली. या दोघांची समस्या एक सारखी असल्यामुळे दोघांचं सूत जुळलं. मग दोघांनी लग्न करण्याची इच्छा आपआपल्या घरी व्यक्त केली तर दोन्ही कडच्या घरातून भक्कम पाठिंबा मिळाला. त्यामुळे दोघेही खूश झाले.

सुकन्याची कहाणी

केरळच्या एर्नाकुलम येथील राहणारी 21 वर्षीय सुकन्याचं आयुष्य सर्वसामान्य लोकांसारखं नव्हतं. सुकन्याचा जन्मच एक ट्रांसजेंडर म्हणून झाला होता. तिचे नातेवाईक तीचा स्वीकार करण्यास तयार नव्हते. त्यामुळे तीचं बालसंगोपन मुलासारखं केलं गेलं. तिला सांगितलं जायचं की तू मुलगा आहे आणि मुलाप्रमाणेच कपडेही घालायला दिले जायचे. पण यामुळे ती समाधानी नव्हती. जेव्हा ती 9 व्या वर्गात होती तेव्हा तिच्या आई-वडिलाने डाॅक्टरांकडे नेलं. तेव्हा तिला हार्मोनल डिसआॅर्डर असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं.

त्यानंतर तिला मेल हार्मोन्सचे इंजेक्शन देण्यात आले. पण इंजेक्शनचा परिणाम झाला नाही. त्यामुळे ती 10 वीची परिक्षा देऊ शकली नाही. वयाच्या 18 वर्षांपर्यंत अनेक अडचणींना तिला सामोरं जावं लागलं.  ती ट्रांसजेंडर असल्यामुळे तिचे मित्र तिला चिडवत होते. त्यानंतर केरळ सोडून सुकन्या बेंगळूरला पोहोचली. एका अनोळखी शहरात ट्रांसजेंडर आयडेंटी घेऊन राहण्यास सुकन्याला अनेक अडचणी आल्यात. पण सुकन्याने हार मानली नाही. तिने आपली आपल्यासोबत घडलेली आपबिती एका वेबसाईट तयार करून शेअर केली.  सुकन्या मुंबईतून Gender reassignment Surgery करत आहे. या उपचारादरम्यान तिची भेट आरव सोबत झाली.

Loading...

आरवची कहाणी

आरव हा पहिले एक मुलीप्रमाणे आयुष्य जगत होता. आरव 1993 मध्ये मुंबईत आला. इथं आल्यावर तो मुलीचे कपडे कपडे घालत होता. इथं त्याने हाॅटेल मॅनजमेंटचा कोर्स केला आणि आॅल इंडिया इंटरनॅशनल टूर्सवर जाऊ लागला. त्याला रेल्वेमध्ये महिलांच्या डब्ब्यात महिला घुसू देत नव्हत्या. आरवने 45 व्या वर्षी सर्जरी केली. आता त्याचा उपचार पूर्ण झालाय. आता त्याला पाहून लोक सांगू शकत नाही की ही कधी काळी मुलगी होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2017 12:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...