देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे, केजरीवालांना आंदोलनाची पायरीही चढू देणार नाही - अण्णा

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे, केजरीवालांना आंदोलनाची पायरीही चढू देणार नाही - अण्णा

देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे सुरू असून ही धोक्याची घंटा आहे. अहंकारी केंद्र सरकारनं लोकांचा विश्वास गमावलाय अशी घणाघाती टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलीय. न्यूज18 लोकमतचे समूह संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेल्याविशेष बेधडक कार्यक्रमात ते बोलत होते.

  • Share this:

राळेगणसिद्धी, 20 मार्च : देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे सुरू असून ही धोक्याची घंटा आहे. अहंकारी केंद्र सरकारनं लोकांचा विश्वास गमावलाय अशी घणाघाती टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलीय. न्यूज18 लोकमतचे समूह संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेल्याविशेष बेधडक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळच्या आंदोलनात अरविंद केजरीवाल यांना आंदोलनाची पायरीही चढू देणार नाही असंही अण्णांनी निक्षून सांगितलं.

23 मार्च पासून अण्णा पुन्हा एकदा दिल्लीच्या रामलिला मैदानावर आंदोलनाचं रणशिंग फुंकणार आहेत. लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे आंदोलन असून मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असंही अण्णांनी सांगितलं. नुसतं सरकार बदलून फायदा नाही तर व्यवस्था परिवर्तन झालं पाहिजे तरच परिस्थिती बदलेल. शेतकरी सुखी झाल्याशिवाय देश सुखी होणार नाही असही अण्णांनी सांगितलं.

अण्णांच्या बेधडक मुलाखतीतले मुख्य महत्वाचे मुद्दे

- पंतप्रधानांना 43 पत्रं लिहिली मात्र एकाही पत्राचं उत्तर पंतप्रधानांकडून आलं नाही. सरकार सत्तेवर आल्यानंतर दिड महिन्यांनी मी पहिलं पत्र लिहिलं. सुरवातीला मला वाटलं पंतप्रधान व्यस्त असल्यामुळे पत्राचं उत्तर देत नसतील, नंतर मात्र ते अहंकारी असल्याचं लक्षात आलं.

- चार वर्ष झाले मी लोकपाल आणि लोकायुक्तांच्या मागणीसाठी आवाज उठवतोय मात्र त्याकडे सरकारचं लक्षं नाही. एवढी वर्ष सरकार झोपलं होतं काय? काँग्रेस सत्तेवर असताना भाजपवाल्यांनीच लोकपालाला पाठिंबा दिला होता.

- देवेंद्र फडणवीस माणूस म्हणून चांगले आहेत. पण त्यांचेही हात बांधलेले आहेत. त्यामुळे ते फार कही करू शकत नाही.

- लोकपाल, लोकायुक्त विधेयक कमकूवत केलं गेलं. अनेक विधयकांवर चर्चा न होता ते मंजूर केले गेले. हे कशाचं लक्षण आहे.

- 20 राज्यांमध्ये माझ्या 40 सभा झाल्या. लोकांचा प्रचंड पतिसाद मिळाला. सोशल मीडियातूनही चांगला प्रचार झाला. पण आजकाल माध्यमांवर दबाव असल्याने ते त्याला फारशी प्रसिद्धी देत नाहीत.

- शेतकरी आज त्रस्त आहे. नागवला जातोय. मात्र त्याकडे कुणाचही लक्ष नाही. 70 वर्षांपासून शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्विकारल्या पाहिजे. शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन दिलं पाहिजे, हमीभाव दिला पाहिजे यासाठी संघर्ष सुरूच राहणार आहे.

- एक दाणा जमीनीत गाडून घेतो तेव्हा कणीस दिसतं. स्थानिक नेतृत्व उभं राहिलं पाहिजे. तरच विकास शक्य आहे. नेतृत्वाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे.

- आंदोलनासाठी जागा मिळावी यासाठी 16 पत्र लिहिली मात्र जागा दिली नाही. आता दोन दिवस राहिले असताना रामलिला मैदानावरची जागा दिली गेली.

- केजरीवालांनी राजकारणात जाऊन धोका दिल्याने यावेळी रामलीला मैदानावर त्यांना व्यासपाठीवर बसायला जागा तर सोडा त्या स्टेजची साधी पायरीही चढू देणार नाही, अशा शब्दात अण्णा हजारेंनी केजरीवालांना फटकारलंय.

 

First published: March 20, 2018, 7:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading