खून केल्यानंतर आईच्या रक्तात सिद्धांतने फरशीवर काढली होती स्माईली

खून केल्यानंतर आईच्या रक्तात सिद्धांतने फरशीवर काढली होती स्माईली

  • Share this:

25 मे : दीपाली गणोरेंच्या हत्येचा एकमेव धागा पोलिसांच्या हाती लागला होता. हा दुवा आहे मारेकऱ्यानं फरशीवर लिहलेलं वाक्य...दीपालीचा मुलगा सिद्धांतने फरशीवर टायर्ड ऑफ हर, कॅच मी अँड हँग मी लिहिलं होतं. एवढंच नाहीतर आईचा खून केल्यानंतर आपण खुश असल्याचं दाखवत त्याने स्माईली काढली होती.

दिपाली गणोरेच्या हत्येची कहाणी सांगणारा हा एकमेव फोटो... आणि तो विचलित करणारा आहे.. यात सिद्धांतने इंग्रजीत फरशीवर लिहिलंय, टायर्ड ऑफ हर, कॅच मी अँड हँग मी...दिपालीच्या रक्तानचं हा विकृत मेसज लिहण्यात आलाय.

या मेसेजवरुन हे स्पष्ट होतोय की, खुनी दिपालीच्या जवळचा आहे.त्याला तिच्या वागण्याचा कंटाळा आला होता आणि तो इतका कंटाळला होती की त्यानं तिचा गळाच चिरला. पुढचा मेसेज आहे कॅच मी अँड हँग मी...तो पोलिसांना पकडण्याच आव्हान देतोय.

इतकचं नाही तर त्याला फाशी दिली तरीही फरक पडणार नाहीये. या मेसेजच्या बरोबर खाली एक हसणारी स्माईलीही आहे.

फरशीवरचा हा संदेश यातली विकृती तर दर्शवतोच. पण महत्वाचं म्हणजे सिद्धांतने अगदी शांत डोक्यानं हे क्रुर कृत्य केल्याचं कळतं. बाजुलाच स्वयंपाक घरातला चाकुही पडलेला पाहायला मिळला. त्यामुळे घरात येण-जाणं असणाऱ्या...घराची पूर्ण माहिती असणाऱ्याचं हे कृत्य असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यातच सिद्धांतही बेपत्ता होता. मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि जोधपूरमधून त्याला अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2017 08:41 PM IST

ताज्या बातम्या