अबब, जिल्हा बँकेत जवळपास 3000 कोटींच्या जुन्या नोटा पडून !

अबब, जिल्हा बँकेत जवळपास 3000 कोटींच्या जुन्या नोटा पडून !

जिल्हा बँकामध्ये जवळपास 3000 कोटी रूपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत. ज्यामुळे राज्यातील 33 पैकी 27 जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत आल्या आहेत.

  • Share this:

रणधीर कांबळे, मुंबई

27 मे : जिल्हा सहकारी बँकांच्या सध्या अस्तित्वा चा प्रश्न निर्माण झालाय कारण 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा स्विकारण्याची अंतिम तारीख 31 मार्चला संपल्यानंतर या बँकामंध्ये जमा झालेल्या पैशाचं करायचे काय हे बँकांना कळतच नाहीय. जिल्हा बँकामध्ये जवळपास 3000 कोटी रूपयांच्या जुन्या नोटा पडून आहेत. ज्यामुळे राज्यातील 33 पैकी 27 जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत आल्या आहेत.

नोटबंदीचा मार जसा सामान्यांना बसलाय तसा तो डीसीसी बँकांनाही बसलाय. जिल्हा बँका ह्या ग्रामीण महाराष्ट्राचा कणा आहेत. नोटबंदीमुळे ह्या बँकांमध्ये 2771कोटी 87 लाख  रुपयांच्या  जुन्या नोटा जमा झाल्यात. त्याचं करायचं काय असा प्रश्न जिल्हा बँकांसमोर आहे. अजून तरी ह्या पैशाबाबत रिजर्व्ह बँक काहीही करायला तयार नाही. उलट जमा रकमेवर बँकांना व्याज द्यावं लागतंय.

राज्यात 33 डीसीसी बँका आहेत. त्यांच्यामार्फत 17 हजार कोटींचं शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलं जातं. पैकी खरिपात 12 ते 13 हजार कोटी रूपये तर उरलेलं चार ते साडेचार हजार कोटींचं कृषी कर्ज दिलं जातं. पण आता यासाठी पैसा आणणार कुठुन?

जिल्हा बँकांच्या बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली गेली. कोर्टानेही केवायसी करण्याचे आदेश दिले. नाबार्डनेही केवायसी केले पण तरीही जुन्या नोटांबाबत निर्णय होत नाहीय.

आता पेरणी तोंडावर आहे. शेतकऱ्यांना कर्जाची गरज आहे. हे कर्ज जिल्हा बँकांच्या माध्यमातून दिलं जातं. पण नोटबंदीनं त्याचंच कंबरडं मोडलं गेलंय. अपेक्षा आहे सरकार याबाबत लवकरच निर्णय घेईल..

कुठल्या बँकाकडे किती नोटा पडून आहेत ?

पुणे जिल्हा बँक 573 कोटी

नाशिक जिल्हा बँके 341 कोटी

सांगली 315 कोटी  

कोल्हापूर 279 कोटी

जळगाव 209.54 कोटी

अहमदनगर 167.77 कोटी

सोलापूर 102.37 कोटी

सातारा 105.95 कोटी

शंभर कोटीहून कमी रकमा असणाऱ्या बँका पाहुयात

अकोला

ठाणे

लातूर

यवतमाळ

अमरावती

औरंगाबाद

रायगड

चंद्रपूर

औरंगाबाद

गडचिरोली

भंडारा  

परभणी

गोंदिया

असं नाही की सगळ्या बँकांमध्ये जुन्या नोटा जमा झाल्यात. काही बँका अशाही आहेत जिथं एकही जुनी नोट जमा झाली नाही.

सिंधुदूर्ग, रत्नागिरी, धुळे-नंदुरबार, उस्मानाबादमधील जिल्हा बँकेत जुन्या नोटा जमा झाल्या नाहीत.

First published: May 27, 2017, 8:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading