मुख्यमंत्र्यांचं हेलिकाॅप्टर 'ज्या' घरावर कोसळलं, 'त्या' घरातले अजूनही बेघरच !

मुख्यमंत्र्यांचं हेलिकाॅप्टर 'ज्या' घरावर कोसळलं, 'त्या' घरातले अजूनही बेघरच !

नगरपालिकेनं तात्पुरता पत्र्याचा शेड टाकून आपली जबाबदारी झटकलीय. पक्क्या घराबद्दल प्रशासन काहीच बोलायला तयार नाहीये.

  • Share this:

नितीन बनसोडे, लातूर

21 नोव्हेंबर : लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर ज्या घरावर कोसळलं होतं, त्या घरातले कुटुंबीय अजूनही बेघरच आहेत. घर बांधून देण्याचं सरकारी आश्वासन सहा महिन्यांनंतरही पूर्ण होऊ शकलेलं नाहीये.

२५ मे २०१७ रोजी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा शहरातल्या कांबळे कुटुंबीयांच्या घरावर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. यामुळे त्यांच्या डोक्यावरचं छप्पर हरवलं. बेघर झालेल्या कांबळे कुटुंबीयांचा विषय न्यूज१८ लोकमतनं लावून धरल्यानंतर त्यांच्या निवासाची तात्पुरती सोय करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी योजनेतून घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. अनेक महिने उलटले तरी कांबळे कुटुंबीय अजूनही घराच्या प्रतीक्षेत आहेत.

नगरपालिकेनं तात्पुरता पत्र्याचा शेड टाकून आपली जबाबदारी झटकलीय. पक्क्या घराबद्दल प्रशासन काहीच बोलायला तयार नाहीये.

पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या घरापासून केवळ दीडशे मीटर अंतरावर कांबळे कुटुंबाचं घर आहे. पालकमंत्र्यांची नजर कधीतरी आपल्याकडे जाईल आणि आपल्याला पक्कं घर मिळेल या आशेवर कांबळे कुटुंब पत्र्याच्या घरात कुडकुडतंय. पण तो दिवस अजूनतरी हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबीयांच्या आयुष्यात आलेला नाहीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2017 10:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading