मुख्यमंत्री कार्यालयाकडून वर्षभरात चहा-नाष्ट्यावर 3 कोटी खर्च, संजय निरुपमांचं आरोपास्त्र

मुख्यमंत्री कार्यालयाकडून वर्षभरात चहा-नाष्ट्यावर 3 कोटी खर्च, संजय निरुपमांचं आरोपास्त्र

राज्य सरकारवर उंदीर घोटाळा केल्याचा आरोप ताजा असतानाच एका नवीन घोटाळ्याने तोंड वर काढलं आहे

  • Share this:

मुंबई, 28 मार्च : कटींग किंवा चहाची जास्तीत जास्त किंमत किती असावी.. टपरीवरचा चहा 10 रूपये तर फाईव्हस्टार हॉटेलमधला चहा अडीचशे ते तीनशे रूपये.. मात्र सरत्या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री कार्यालयात चहा आणि अल्पोपहारावर 3 कोटी 34 लाख 64 हजार इतका खर्च झालाय. माहिती अधिकारासाठी दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देताना ही आकडेवारी जाहीर करण्यात आलीय. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा आकडा दुपटीनं वाढलाय.

राज्य सरकारवर उंदीर घोटाळा केल्याचा आरोप ताजा असतानाच एका नवीन घोटाळ्याने तोंड वर काढलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलाय. मुख्यमंत्री कार्यालयात 2015-2016, 2016-2017 आणि 2017-2018 मध्ये चहा आणि अल्पोपहारावर केलेला खर्च हा दरवर्षी दुपटीहून अधिक झाल्याकडे संजय निरुपम यांनी लक्ष वेधलं.

माहितीच्या अधिकारा अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, 2015-2016 साली सीएमओमध्ये चहा आणि अल्पोपहारावर 57 लाख 99 हजार 156 रुपये खर्च झाला होता. तो खर्च 2016-2017 मध्ये एक कोटी 20 लाख 92 हजार 972 रुपयांवर पोहोचला.

त्यानंतर 2017-2018 वर्षात तर चहा आणि अल्पोपहारावर तीन कोटी 34 लाख 64 हजार 905 रुपये खर्च झाला. म्हणजे गेली तीन वर्षे प्रत्येक वर्षी चहा आणि अल्पोपहारावर खर्च वाढत गेल्याचं निरुपम म्हणाले.

संजय निरूपम यांचे आरोप

- दर दिवशी 92 हजार 958 रुपये चहावर खर्च

- त्या हिशोबाने दर दिवशी 18 हजार 591 कप चहा प्यायला जातो

दर मिनिटाला पाच रुपये हिशोबाने 64 रुपये खर्च होतो

- दर मिनिटाला 12 कप चहा प्यायला जातो

वर्ष 2017-18 मध्ये चहावर 3 कोटी 34 लाख, 64 हजार 905 रुपये खर्च करण्यात आला

- दर महिन्याला 27 लाख 88 हजार रुपये खर्च

- दर महिन्यात 5 लाख 57 हजार 748 कप चहा

माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार वर्ष 2015- 2016

57 लाख 99 हजार 156 रुपये खर्च

वर्ष 2016- 2017

1 कोटी 20 लाख, 92 हजार 972 खर्च

वर्ष 2017- 2018

3 कोटी 34 लाख 64 हजार 905 रुपये खर्च

मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण

दरम्यान, मुख्यमंत्री सचिवालयातील चहापानाच्या खर्चाबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहिती अधिकाराचा आधार घेत जो निष्कर्ष काढला आहे तो पूर्णत: चुकीचा आहे. तो केवळ चहापानाचा खर्च नसून त्यात चहापान, नाश्ता, जेवण, मंत्रिमंडळ बैठकींसाठी होणारा नाश्ता, सत्कारासाठी पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ, भेटवस्तू, सर्व प्रकारच्या आणि विविध विभागांच्या बैठका, शिष्टमंडळासाठीचा खर्च असा संपूर्ण आतिथ्य खर्च समाविष्ट आहे. हा खर्च केवळ मुख्यमंत्री सचिवालयाचा नसून त्यात मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह, वर्षा निवासस्थान, नागपूर येथील रामगिरी निवासस्थान, हैद्राबाद हाऊस या सर्व ठिकाणचा खर्च समाविष्ट आहे असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2018 08:57 PM IST

ताज्या बातम्या