पिझ्झा, बर्गर नाही; 2017 मध्ये भारतीयांची पहिली पसंती चिकन बिर्याणीला!

सगळ्यात जास्त ऑर्डर केल्या जाणाऱ्या टॉप-5 डिशमध्ये चिकन बिर्याणीबरोबरच मसाला डोसा, बटर नान, तंदुरी रोटी, पनीर बटर मसाला, त्याचबरोबर केक, चिकन आणि मोमो या पदार्थांचीही मागणी आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 26, 2017 06:30 PM IST

पिझ्झा, बर्गर नाही; 2017 मध्ये भारतीयांची पहिली पसंती चिकन बिर्याणीला!

26 डिसेंबर : गोष्ट जर खाण्याची असेल तर आपण भारतीय सगळ्यात पुढे आहोत. पण सगळ्या भारतीयांची खाण्याची पसंती आहे ती चिकन बिर्याणीला त्यामुळे भारतातल्या प्रसिद्ध डिशमध्ये पिझ्झा आणि बर्गर मागे पडलं आहे अशी माहितीच ऑनलाईन खाद्यपदार्थ डिलीव्हरी करण्याऱ्या स्विगी डॉट कॉम या वेबसाईटच्या रिपोर्टमधून देण्यात आली आहे.

ऑनलाईन सर्व्हेनुसार 2017ला सगळ्यात जास्त ऑर्डर केल्या जाणाऱ्या टॉप-5 डिशमध्ये चिकन बिर्याणीबरोबरच मसाला डोसा, बटर नान, तंदुरी रोटी, पनीर बटर मसाला, त्याचबरोबर केक, चिकन आणि मोमो या पदार्थांचीही मागणी आहे.

मंडळी पिझ्झा आणि बर्गरला मागणी तर आहेच पण चिकन बिर्याणीपेक्षा जास्त नाही. खरं तर आधुनिकतेमुळे आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांची मागणी वाढलेली पहायला मिळते पण स्विगीच्या या सर्व्हेवरुन भारतीयांना देशी खाणही आवडतं असंच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2017 06:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...