शेतकरी कर्जमाफी इम्पॅक्ट, सत्ताधारी विरोधकांच्या 'दारी' !

आज मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. सरकारच्या भूमिकेत झालेला हा बदल शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरणार का हे आता पाहावं लागेल.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 23, 2017 06:55 PM IST

शेतकरी कर्जमाफी इम्पॅक्ट, सत्ताधारी विरोधकांच्या 'दारी' !

कौस्तुभ फलटणकर, नवी दिल्ली

23 जून : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारनं आता विरोधी पक्षांशीही चर्चा करायला सुरुवात केलीय. म्हणूनच आज मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. सरकारच्या भूमिकेत झालेला हा बदल शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरणार का हे आता पाहावं लागेल.

उत्तर प्रदेश, पंजाब आणि पाठोपाठ कर्नाटाकतल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनंतर फडणवीस सरकारवही दबाव वाढलाय. त्यातच आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना कर्जाची पहिली उचलं देणं सरकारला शक्य झालेलं नाहीय. त्यामुळे आता हा प्रश्न साधासोपा नाही याची जाणीव झालेल्या सरकारनं आता सर्वच पक्षांना विश्वासात घ्यायला सुरूवात केलीय. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली. यावेळी धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटीलही उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा पहिला संप मुख्यमंत्र्यांनी भलत्या रात्री घाईघाईनं संपवून टाकला. पण ही घाई सरकारच्या अंगाशी आली. त्यानंतर एक समिती नेमून सरकारला शेतकऱ्यांशी चर्चा करावी लागली. पण कर्जमाफीचा तिढा काही अजून सुटलेला नाहीय.

विरोधकांसोबतच सरकारचा मित्रपक्ष असलेली शिवसेनाच या मुद्द्यावर सरकारची अडवणूक करण्याची एकही संधी सोडत नाही. म्हणून राजकीय पक्ष विरोधात जाऊ नये, यासाठी सरकारनं विरोधकांशीही चर्चेचा मार्ग स्वीकारला. आता विरोधक आणि सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2017 06:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...