कर्जमाफी नेमकी कशी आणि कुणाला ?, चंद्रकांत पाटलांनी दिली सगळी उत्तरं

शेतकऱ्यांच्या रेट्यासमोर अखेर देवेंद्र सरकारनं नमतं घेत सरसकट कर्जमाफी पण काही निकषांसह जाहीर केली. कर्जमाफी कशी असेल, तिचे निकष काय असतील याबाबत संभ्रम अवस्था निर्माण झाली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2017 09:29 PM IST

कर्जमाफी नेमकी कशी आणि कुणाला ?, चंद्रकांत पाटलांनी दिली सगळी उत्तरं

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई

12 जून : शेतकऱ्यांच्या रेट्यासमोर अखेर देवेंद्र सरकारनं नमतं घेत सरसकट कर्जमाफी पण काही निकषांसह जाहीर केली. कर्जमाफी कशी असेल, तिचे निकष काय असतील याबाबत संभ्रम अवस्था निर्माण झाली. आम्ही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना याबाबत विचारलं..

सरसकट कर्जमाफीलाही निकष

लावले गेलेत, हे निकष कोणते?

अल्पभूधारक शेतकऱ्यांना आता

Loading...

कर्जवाटप कधी सुरु करणार?

विदर्भ, मराठवाड्यातला 10 एकरवाला

शेतकरीही अडचणीत, त्याचं काय?

नेते, नोकरदार, व्यावसायिक, डॉक्टर्स, इंजिनिअर्स

यांचंही कर्ज माफ होणार का?

संपूर्ण कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण

व्हायला किती काळ लागणार?

सरकार एवढ्या मोठ्या कर्जमाफीची

पूर्तता नेमकी कशी करणार?

महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी ह्यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं दिली. निकषांनी जो संभ्रम निर्माण केला त्याबद्दलही ते सविस्तर बोललेत.

महाराष्ट्रातल्या  शेतकऱ्यांवर जवळपास 1 लाख कोटींचं कर्ज आहे. त्यातलं बरंचसं कर्ज हे नेते, नोकरदार, व्यावसायिक, डॉक्टर्स, इंजिनिअर्स अशांवर आहे. त्यांना कर्जमाफी देऊ नये अशी मागणी शेतकरी संघटनांनीच केलीय. त्याबाबत मात्र सरकार सावध भूमिका घेताना दिसतंय.

कर्जमाफी ही खऱ्या शेतकऱ्यालाच मिळाली पाहिजे. नोकरदार, नेते, व्यावसायिकांना कर्जमाफी म्हणजे सरकरी तिजोरीवर डल्ला असल्याचं मत जाणकार व्यक्त करतायत. त्यातच जिल्हा बँका डबघाईला आलेल्या आहेत, त्या कर्जवाटप कशा करणार असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय. त्याचंही उत्तर चंद्रकांत पाटलांनी दिलंय.

कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री आतापर्यंत सगळे एकटंच करतायत आणि त्यात मंत्री, अधिकारी सोबत नव्हते असं चित्रं पहायला मिळालं. पण संघटनांच्या रेट्यानंतर आता मात्र चंद्रकांत पाटील हे सगळ्यांना सोबत घेण्याबाबत बोलतायत. हाही बदल चांगला म्हणायला हवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 09:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...