IBN लोकमतचा मदतीचा हात,अखेर 'त्या' महिलेला मिळाला बाॅम्बे ब्लॅड ग्रुपचा रक्तदाता

IBN लोकमतचा मदतीचा हात,अखेर 'त्या' महिलेला मिळाला बाॅम्बे ब्लॅड ग्रुपचा रक्तदाता

बाॅम्बे ब्लड या अत्यंत दुर्मिळ रक्ताची गरज असल्याची बातमी आयबीएन लोकमतने वारंवार दाखवली आणि हीच बातमी पाहून लगेचच तासगाव मधील विक्रम यादव हे बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्तदाते या महिलेच्या मदतीला धावून आले

  • Share this:

दिनेश केळुसकर,रत्नागिरी

05 एप्रिल : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या गरीब कष्टकरी महिलेला बाॅम्बे ब्लड या अत्यंत दुर्मिळ रक्ताची गरज असल्याची बातमी आयबीएन लोकमतने वारंवार दाखवली आणि हीच बातमी पाहून लगेचच  तासगाव मधील विक्रम यादव हे बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्तदाते या महिलेच्या मदतीला धावून आले आणि या महिलेची प्रसुती सुलभ झाली.

अंजली हेळकर या प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेला बॉम्बे ब्लडची गरज आहे हे आयबीएन लोकमतच्या बातमीतून लक्षात येताच सांगली जिल्ह्यातले विक्रम यादव आपल्या सहकाऱ्यासह भल्या सकाळीच रत्नागिरीत दाखल झाले. त्यांच्या प्राथमिक तपासण्या झाल्यावर त्यांचं रक्त घेण्यात आलं. आणि अंजली हेळकर याना देण्यात आलं. यादव यांच्या या दातृत्वामुळे अंजलीची प्रसुती सुलभ झाली.

जिल्हा शल्य चिकित्सक  ए. आर. अरसूलकर म्हणतात,"आयबीएन लोकमतने ही बातमी दाखवली  आणि अर्ध्या तासात रिस्पॉन्स आला आणि सांगली जिल्ह्यातले डोनर त्यांनी आज रक्तदान केलंय आणि त्या महिलेचे प्राण वाचवण्यास मदत झालीय"

यादव यांच्या ग्रुपमध्ये रक्तदान करणाऱ्या वेगवेगळ्या रक्तगटाच्या तब्बल 15 हजार 700 जणांचा समावेश आहे. शिवाय बॉम्बे ब्लड ग्रुप नावानं त्यानी सुरू केलेल्या स्वतंत्र ग्रुपमध्ये देश विदेशातल्या 280 जणांची माहिती आहे. कुणाला कुठेही कधीही रक्त लागलं की, व्हॉट्सॅप ग्रुपद्वारे कळवण्यात येतं आणि त्या त्या भागातला रक्तदाता एखाद्याचा जीव वाचवायला पुढे सरसावतो.

रक्तदाते विक्रम यादव म्हणतात, "1995 साली ज्यावेळी मित्राचा अपघात झाला होता त्यावेळी मी ब्लड डोनेशनला गेलो होतो त्यावेळी समजल की तुमचा हा ब्लड ग्रुप आहे आणि एकदम दुर्मिळ आहे आणि असे बॉम्बे ब्लॅड ग्रुपचे डोनर असतील तर पाहा कारण हे ब्लड मिळत नाही आणि एकदम दुर्मिळ आहे. त्या दिवसापासून आम्ही सुरुवातच केली.

चितळे डेअरीत चालक पदावर असलेल्या यादव यांनी स्वत: गेल्या वीस वर्षात 42 वेळा रक्तदान केलंय. शिवाय त्यांची संस्था अत्यंत गरीब रुग्णांना येणाऱ्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चात मोठा हातभार लावतेय.

अंजली हेळकर यांची प्रसुती होऊन छान बाळ जन्माला आलंय. अंजलीनं यादवांचे मनापासून आभार मानलेयत. आणि आयबीएन एका गरजूला मदत मिळाल्यामुळे आयबीएन लोकमतलाही समाधान मिळालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 10:21 PM IST

ताज्या बातम्या