...म्हणून व्हिडिओ रेकाॅर्ड केला होता, 'त्या' व्हायरल व्हिडिओतील मुलीची ओळख पटली

हा व्हिडिओ गायक -संगीतकार तोशी आणि शारिब साबरी यांच्या भाचीचा आहे. या मुलीचं नाव हया आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2017 09:24 PM IST

...म्हणून व्हिडिओ रेकाॅर्ड केला होता, 'त्या' व्हायरल व्हिडिओतील मुलीची ओळख पटली

23 आॅगस्ट : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका चिमुरडीच्या शिकवणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली, शिखर धवनने या व्हिडिओवर आक्षेप घेत मुलांना असं शिकवत जाऊ नका ?, असा सल्ला दिला होता. पण, आता या व्हिडिओत व्हायरल झालेल्या मुलीचा शोध लागलाय.

एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ गायक -संगीतकार तोशी आणि शारिब साबरी यांच्या भाचीचा आहे. या मुलीचं नाव हया आहे. या मुलीचे आणखी काही व्हिडिओ तुम्हाला शारिब यांच्या अकाऊंटवर पाहण्यास मिळतील.

तोशी यांनी या प्रकरणावर एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली.  "विराट कोहली आणि शिखर धवन यांना आमच्या या भाचीबद्दल फारशी माहिती नाही. हया कशी आहे हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल होईल याचा आम्हाला बिल्कुल अंदाज नव्हता. आम्ही हा व्हिडिओ आमच्या फॅमिल ग्रुपवर शेअर केला होता, ती अभ्यास करत नव्हती म्हणून हा व्हिडिओ तिच्या वडिलांना दाखवण्यासाठी रेकाॅर्ड केला होता असा खुलासा तोशी साबरी यांनी दिली.

तोशी पुढे म्हणतात, "मुलांना आता नर्सरीपासूनच होमवर्क दिला जातोय. व्हिडिओमध्ये तुम्ही तिला रडताना पाहिलं. पण असं रडणं हे काही वेळापुरतं असतं. कारण तिची अभ्यास करण्यापासून सुटका होईल आणि आपल्याला खेळण्यासाठी मिळेल. हया ही 3 वर्षांचा आहे. प्रत्येक घरात लहान मुलं हट्टी असतात त्यांची कोणती ना कोणती जिद्द असते. आमची हयाही खूप जिद्दी आहे , मस्तीखोर आहे, पण ती आमच्या लाडाची आहे."

पण लाडामुळे आम्ही तिला सूट दिली तर ती अभ्यास करेल का ?, मुलांनी हट्ट केला तर त्यांना शिकवायचं नाही का ?, त्यामुळे कुणीही तातडीने कोणत्याही निष्कर्षावर जाऊ नये अशी विनंतीही तोशी यांनी केली.

Loading...

Independance day wish from my jaanam baby JAI HIND

A post shared by Sharib Sabri (@sharibsabri) on

meraaaa jaaanam baby chinese bacccha#daughters#mama#peace#

A post shared by Sharib Sabri (@sharibsabri) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2017 09:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...