कापडी पिशवी वापरा, पैठणी मिळवा !

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भाजी खरेदीसाठी आलेल्या महिलांनी प्लॅस्टिक पिशव्या ऐवजी कापडी पिशव्या वापराव्या यासाठी एक नामी शक्कल लढविली आहे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 1, 2017 09:16 PM IST

कापडी पिशवी वापरा, पैठणी मिळवा !

मंगेश चिवटे, मुंबई

01 मे :  मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भाजी खरेदी साठी आलेल्या महिलांनी प्लॅस्टिक पिशव्या ऐवजी कापडी पिशव्या वापराव्या यासाठी एक नामी शक्कल लढविली आहे. कापडी पिशव्या वापरणाऱ्या महिलांना आता लकी ड्राच्या माध्यमातून पैठणी भेट देण्यात येणार आहे.

प्लॅस्टिकमुक्तीसाठी मुंबईतील डोंगरी भागातील भाजी बाजारात कापडी पिशव्या घेऊन भाजी खरेदीसाठी आलेल्यांना कुपन वाटप केलं जातंय. या कुपन मधून आता लकी ड्रा काढला जाणार असून विजेत्या महिलांना पैठणी भेट दिली जाणार आहे.

प्लॅस्टिक मुक्तीसाठी वापरलेल्या या अनोख्या फंडयाचं प्रोमोशन करण्यासाठी सिने अभिनेत्यांचीही मदत घेण्यात येत आहे.

प्लॅस्टिकमुक्तीसाठी आमचा प्रयत्न आहे. आता पैठणीच्या आमिषाने का होईना महिला कापडी पिशव्या घेऊनच बाहेर पडतील अशी अपेक्षाही संकल्पना राबविणारे मुंबई महापालिकेचे अधिकारी उदय शिरूरकर यांनी सांगितलं.

Loading...

प्लॅस्टिकमुक्तीसाठी पैठणी ही अनोखी संकल्पना मुंबईतील सर्वच भाजी बाजारांत राबविली गेली तर नक्कीच सकारात्मक बदल होवू शकतो. पण प्लॅस्टिकमुक्त मुंबईसाठी प्रत्येक मुंबईकर जोपर्यंत पुढे येत नाही. तोपर्यंत प्लॅस्टिकमुक्ती अशक्यप्राय गोष्ट हेच कटूसत्य आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2017 09:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...