'ब्लू व्हेल चॅलेन्ज' गेममुळे मुंबईतही 14 वर्षीय मुलाची आत्महत्या

'ब्लू व्हेल चॅलेन्ज' गेममुळे मुंबईतही 14 वर्षीय मुलाची आत्महत्या

'ब्लू व्हेल चॅलेन्ज' या गेममुळे जगभरात जवळपास 150 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केल्यात. मुंबईतही एका 14 वर्षांच्या मुलानं याच 'ब्लू व्हेल चॅलेन्ज' गेममुळे आत्महत्या केल्याचं समोर आलंय. ब्लू व्हेल चॅलेन्ज या गेममुळं झालेली भारतातील पहिली आत्महत्या आहे.

  • Share this:

रोहिणी गोसावी, मुंबई

मुंबई, 31 जुलै : हल्ली मोबाईलवर गेम खळणं हे मुलांसाठी व्यसन बनलंय. प्रत्येक नवीन गेम हा मुलांच्या कुतहलाचे विषय असतात. पण हल्ली अनेक गेम मुलांसाठी घातक ठरतायेत. असाच एक भयंकर गेम सध्या जगभरातल्या मुलांसाठी जीवघेणा ठरतोय. या गेमचं नाव आहे 'ब्लू व्हेल चॅलेन्ज'. या गेममुळं मुलं चक्क स्वत:चं आयुष्यच संपवतात. म्हणजे आत्महत्या करतात. आता, एखाद्या व्हिडीओ गेममुळं मुलं आत्महत्या कशी करु शकतात असा प्रश्न आपल्याला पडू शकतो, पण हे खरं आहे.

 'ब्लू व्हेल गेम'मुळे भारतातील पहिली आत्महत्या

'ब्लू व्हेल चॅलेन्ज' या गेममुळे जगभरात जवळपास 150 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केल्यात. मुंबईतही एका 14 वर्षांच्या मुलानं याच 'ब्लू व्हेल चॅलेन्ज' गेममुळे आत्महत्या केल्याचं समोर आलंय. ब्लू व्हेल चॅलेन्ज या गेममुळं झालेली भारतातील पहिली आत्महत्या आहे.

पाहुयात हा गेम कसा खेळला जातो ?

गेम डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला हा गेम साध्या डोळ्यांनी खेळता येत नाही. त्यासाठी 'व्हर्च्युअल रिअॅलिटी डिव्हाईस'ची गरज असते, त्यानंतरच तुम्ही त्या गेममध्ये प्रवेश करु शकता. एकदा का तुम्ही त्या गेममध्ये प्रवेश केला की तुम्हाला रोज एक टास्क देण्यात येतं. यात 50 टास्क असतात. 50 व्या दिवशी तुमच्या आयुष्यासोबत हा गेम संपतो.

ब्लू व्हेल गेममधील जीवघेणी 'टास्क' ?

- तुमच्या हातावर किंवा खांद्यावर एक ठराविक गोष्ट कोरुन घ्यायची

- पहाटे 4.20 वाजता उठा आणि तुमच्या गेमच्या प्रमुखानं पाठवलेला भयानक व्हिडीओ बघा

- तुमच्या खांद्यावर ब्लेडमध्ये कट मारुन घ्या...

- कागदावर व्हेल माशाचं चित्र काढा

- तुम्हाला व्हेल बनायचं असेल तर तुमच्या पायावर S असं कोरा, नाही तर तुमच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी कट मारुन घ्या.

- त्यानंतर तुम्हाला सिक्रेट टास्क मिळतो

- आलेला सिक्रेट मेसेज तुमच्या खांद्यावर कोरुन घ्या

- तुम्ही व्हेल असल्याचा ऑनलाईन मेसेज टाका

- पहाटे 4.30 वाजता उठून टेरेसवर जा

- स्वत:च्या हातावर व्हेल कोरुन घ्या

- दिवसभर भयानक व्हिडिओ बघा

- गेम प्रमुखानं पाठवलेलं संगीत ऐका

- स्वतःचे ओठ कापून घ्या

- स्वत:च्या शरीरावर जखमा करुन घ्या

- टेरेसच्या कठड्यावर उभं रहा. आणि पाय बाहेर सोडून कठड्यावर बसा

- पुलावर उभं राहा

- दिवसभर कुणाशीही बोलू नका

- दरम्यान, गेमप्रमुख तुमच्या मरणाची तारीख ठरवतो

- तुम्ही व्हेल आहात, हे कुणालाही सांगू नका अशी गोपनियतेची शपथच घ्यावी लागते

गेम तयार करणाऱ्याला अटक

हा गेम एका रशियन नागरिकानं तयार केलेला आहे. आत्महत्येच्या घटना घडल्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मला पृथ्वीवरील बायोलॉजीकल वेस्ट साफ करायचंय म्हणून मी हा गेम तयार केल्याची त्यानं प्रतिक्रीया दिलीय.

पालकांनी काय सावधानता बाळगावी ?

तुमचा मुलगा मोबाईलवर अशी जीवघेणी गेम खेळताना आढळून आल्यास तात्काळ त्याला ही गेम खेळण्यापासून परावृत्त करा. 'ब्लू व्हेल चॅलेन्ज' गेममध्ये दिलेल्या टास्कपैकी एखादीही क्रिया अथवा तशी लक्षणं तुमच्या मुलाच्या वर्तणुकीतून आढळून आल्यास त्याला रोखा, त्याला ही जीवघेणी गेम खेळण्यापासून रोखा, आवशक्यता वाटल्यास त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2017 07:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading