मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भाजप आमदाराची दादागिरी, पोलिसाला केली मारहाण

आमदार सुधीर पारवे यांच्या कारने टायरला धक्का दिला. त्यामुळे आमदार पारवे हे संतप्त होऊन वाहनातून उतरले आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल गरजे यांना शिवीगाळ करीत मारहाण करायला सुरुवात केली.

Sachin Salve | Updated On: Mar 5, 2018 06:32 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात भाजप आमदाराची दादागिरी, पोलिसाला केली मारहाण

 प्रवीण मुधोळकर, नागपूर

नागपूर, 05 मार्च : कारचे निघालेले टायर वाहनाला लागल्याच्या क्षुल्लक कारणातून उमरेडचे भाजप आमदार आणि पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांनी पोलिसाला मारहाण केली आहे. गेल्या महिनाभरातील आमदार पारवेंनी मारहाण केलेली ही तिसरी घटना आहे. या प्रकरणात आमदारांवर कारवाई होवू नये म्हणून प्रचंड दबाव येत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

नागपुरच्या सदर पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक अजय गरजे पत्नीसह गिरड देवस्थानात दर्शन करून येत असतांना कार पंक्चर झाल्याने ते चाक काढून दुरुस्तीसाठी घेऊन जात होते. तेवढ्यात मागून येणारे भाजपचे आमदार सुधीर पारवे यांच्या कारने टायरला धक्का दिला. त्यामुळे आमदार पारवे हे संतप्त होऊन वाहनातून उतरले आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल गरजे यांना शिवीगाळ करीत मारहाण करायला सुरुवात केली.

रविवारी रात्रीच अनिल गरजे यांनी उमरेड पोलीस ठाणे गाठले. शिक्षिका असलेल्या त्यांच्या पत्नी संजीवनी यांनी याबाबत उमरेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. आमदार पारवे यांनीही उमरेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलीये अशी माहिती  उमरेड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सुनील लाघी यांनी दिली.

पण आमदार सुधीर पारवे यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून सहायक उपनिरीक्षक अजय गरजे यांनीच शिवीगाळ केल्याचा दावा केला आहे.

एका गाडीचा टायर आमच्या गाडाखाली आला. गाडीच नुकसान झालं. त्यानंतर ता गाडीचा मालक मागावून आला. तो पोलीस अधिकारी होता. त्याने दारू पिलेली होती. त्यांनीच बायकोला पुढे करत, खोटी तक्रार केली. ही तक्रार खोटी आहे असा दावाच सुधीर पारवेंनी केलाय.

विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यातच पारवे यांनी कबड्डी सामन्यात मधुकर अखंडे यांना मारहाण केली. या महिनाभरात आमदार पारवे यांनी नागरिकांना मारहाण केल्याची ही तिसरी घटना आहे.

शिक्षकाला मारहाण केल्याच्या प्रकरणात आमदार सुधीर पारवे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार कायम आहे. पण आमदार लोकांना मारण्यातच धन्यता मानत असल्याच विरोधकांच म्हणन आहे.

तर निवडणूक आयोगाने आपला अभिप्राय सुप्रीम कोर्टातही तोच दिला आहे जो हायकोर्टात दिला होता. त्यांची आमदारकी शिक्षकाला मारहाण प्रकरणात रद्द होवू शकते असं याचिकाकर्ते  संजय मेश्राम यांनी म्हटलंय.

या प्रकरणात राजकीय दबाव असल्याने कारवाई होत नसल्याचं बोललं जातंय.

शिक्षकाला मारहाण केल्याच्या प्रकरणात हायकोर्टाने सुधीर पारवे यांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश दिले होते सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. गेल्या महिनाभरात तीन नागरिकांना आमदारांनी मारहाण केली आहे पण कारवाई हवी तशी नाही. या प्रकरणात तरी कारवाई होईल अशी अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 5, 2018 06:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close