फेरीवाल्याला शिवीगाळ करणाऱ्या अमित साटमांना ना खंत ना पश्चाताप !

फेरीवाल्याला शिवीगाळ करणाऱ्या अमित साटमांना ना खंत ना पश्चाताप !

भाजप आमदार अमित साटम यांनी फेरीवाल्यांना केलेली शिवीगाळ वादात सापडलीये. साटम यांना मात्र त्यांनी केलेल्या कृत्याचा कोणताच पश्चाताप नाही.

  • Share this:

दिनेश मौर्या आणि मंगेश चिवटे, मुंबई

11 सप्टेंबर : भाजप आमदार अमित साटम यांनी फेरीवाल्यांना केलेली शिवीगाळ वादात सापडलीये. साटम यांना मात्र त्यांनी केलेल्या कृत्याचा कोणताच पश्चाताप नाही.

भर रस्त्यात शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी माफी मागायला नकार दिलाय. अमित साटम यांनी  शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अमित साटम यांनी पोलिसांनाही दमदाटी केली होती. ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर टीका झाल्यानं अमित साटम यांनी आपली चूकही कबूल केली होती. पण आता मात्र त्यांनी घूमजाव करत माफी मागायला नकार दिलाय.

रस्त्यावर शिवीगाळ करणार हा कोणी साधासुधा माणूस नाहीये बरं का. हे आहेत भाजपचे आमदार अमित साटम.. साटम यांनी जुहूतल्या फेरिवाल्यांना शिवीगाळ केली. एवढंच नाही तर पोलिसांचा त्यांच्यासमोरच उद्धार केला. एवढं करूनही त्यांना याचा काहीच पश्चाताप नाही.

साटमांच्या या दादागिरीविरोधात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी मोर्चा काढला. साटमांची ही दादागिरी हप्तेबाजीसाठी असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

साटम यांचं म्हणणं खरं मानलं तरी कुणाला शिवीगाळ करण्याचा अधिकार यांना कुणी दिला असा सवालही आता मुंबईकर विचारू लागलेत.

First published: September 11, 2017, 11:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading