भाजपला नगरसेवकांवर भरोसा नाय का?, नागपुरात 112 नगरसेवकांचे घेतले राजीनामे !

भाजपला नगरसेवकांवर भरोसा नाय का?, नागपुरात 112 नगरसेवकांचे घेतले राजीनामे !

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला भरभरुन यश मिळालं, पण वर्षभरातच भाजपनं आपल्या नगरसेवकांचे राजीनामे पक्षाकडे घेतल्याने नवा वाद निर्माण झालाय.

  • Share this:

26 जानेवारी : नागपूर हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं होमग्राऊंड...मात्र भाजपचा नागपुरातील नगरेसवकांवर भरवसा नाय का असा सवाल आता विचारला जातोय. आणि त्यामागचं कारण म्हणजे नागपूर पालिकेतल्या सर्व भाजप नगरसेवकांकडून पक्षाने राजीनामे लिहून घेतले आहे.

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपला भरभरुन यश मिळालं, पण वर्षभरातच भाजपनं आपल्या नगरसेवकांचे राजीनामे पक्षाकडे घेतल्याने नवा वाद निर्माण झालाय. नगरसेवकांचे राजिनामे घेतल्यानंतर सुरक्षित सत्तापक्ष नेत्याकडे ठेवण्यात येतात. यामुळे पार्टीची विचारधारा तोडली किंवा पार्टीविरोधी कार्य केल्यास, त्या नगरसेवकावर कारवाई करणं सोपं जात असल्याचं भाजप नेते सांगतात.

पक्षशिस्त टिकावी आणि पक्षाला नुकसान होईल असं कृत्य कुठल्या नगरसेवकानं केल्यास त्याच्यावर कारवाई करता यावी या उद्देशानं नागपुर महापालिकेतील भाजपच्या सर्व 112 नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात आले आहे असं भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी सांगितलं.

नगरसेवकांचे राजिनामे घेण्याची नागपुरात भाजपची ३० वर्षांची परंपरा असल्याचंही यावेळी भाजपकडून सांगण्यात आलंय. भाजपची पक्षशिस्त टिकवण्यासाठी नगरसेवक निवडूण आल्यानंतर त्यांचे एकत्र राजिनामे घेतले जातात, यावेळेस काही कारनास्तव विलंब झाला असल्याच भाजपन सांगतल्यावर शिवसेन आमदार खासदारांचेही राजीनामे घेतले जातात का असा प्रश्नही उपस्थित केलाय.

अनुशासन प्रिय पक्ष अशी प्रतिमा असलेल्या भाजपमध्येच नगरसेवकांचे राजीनामे घेतल्यामुळे नाराजी आहे. नगरसेवकांचे राजीनामे घेतल्याच्या वृत्तानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडालीय. भाजपचा आपल्याचं नगरसेवकांवर विश्वास नाही का? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय.

First Published: Jan 26, 2018 10:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading