सिंधुदुर्गमध्ये जीवघेण्या खड्ड्यांचे रस्ते

या खड्ड्यांमुळे वाहनांचं तर अतोनात नुकसान होतंच आहे पण या खड्ड्यांमुळे भीती आहे ती अपघात होऊन जीव जाण्याची म्हणूनच आम्ही प्रश्न विचारतोय की अपघातात जीव जाण्यासाठी किती मोठा खड्डा आवश्यक आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2017 07:46 PM IST

सिंधुदुर्गमध्ये जीवघेण्या खड्ड्यांचे रस्ते

दिनेश केळुस्कर, 30 जुलै : तुम्ही जर सध्या सिंधुदुर्गात गेलात तर लाखो खड्डे तुमच्या स्वागताला हजर आहेत ! या खड्ड्यांमुळे वाहनांचं तर अतोनात नुकसान होतच आहे पण या खड्ड्यांमुळे भीती आहे ती अपघात होऊन जीव जाण्याची म्हणूनच आम्ही प्रश्न विचारतोय की अपघातात जीव जाण्यासाठी किती मोठा खड्डा आवश्यक आहे.

अपघातात जीव जाण्यासाठी केवढा खड्डा आवश्यक आहे? एवढा की एवढा की त्याच्या बाजूला असलेला हा एव्हढा की त्याच्या आणखी बाजूला असलेला हा एव्हढा खड्डा त्याच्यानंतरचा हा पुढचा? असे खड्डे वेगवेगळ्या प्रकारचे खड्डे आहेत आणि हा तळेरे ते कोल्हापूर कडे जाणारा राज्यमार्ग आहे. या राज्यमार्गाचीच केवळ अशी अवस्था नाहीये. अख्खा सिंधुदुर्ग खड्ड्यात गेलाय.

पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या रस्त्यांची अवस्था बघा ! तळेरे ते वैभववाडी मार्गे कोल्हापtरकडे जाणारा हा रस्ता जणू प्रवाशांचे जीव घेण्यासाठी सज्ज झालाय ! आत्तापर्यंत लाखो रुपये या रस्त्यावर खर्च झालेत.

मोटारसायकलस्वार म्हणतोय, 'काय आहे की आता या खड्ड्यात पडलो तर जीवच जाणार आहे . पण लोक महाराष्ट्रीयन आहेत म्हणून टिकलेयत आत्तापर्यंत . या खड्ड्यातून जाण्यासारखा विषयच राहिलेला नाही . लोकांच्या कंबरा आणि आजारपण यायला लागलय खड्ड्यातून रोज प्रवास करून. हे अस किती दिवस चालणारेय?'

रिक्षा ड्रायव्हर म्हणतात, ' सरकारपुढे काहीच करू शकत नाही. कोणी आलं तरी हीच अवस्था आहे कारण हा रस्ता म्हणतात परत केंद्र सरकारकडे गेलाय. आम्ही दाद मागणार कुणाकडे ? आणि आम्हाला पण आता सहन होत नाही. हे बघा रोग लागलाय पण पोटासाठी करायला पाहिजे. तक्रार करायची कुणाकडे ? इलाजच नाही. '

Loading...

सिंधुदुर्गातल्या अंतर्गत रस्त्यांचीही दळणवळण ठप्प होईल अशीच दैना झालीय. पावसामुळे रस्ते खराब झालेयत अस प्रशासनाकडून सांगण्यात येत असलं तरी खरं कारण आहे ते रस्त्याच्या ठेकेदारीत होणारा भ्रष्टाचार आणि त्यामुळे होणारं निकृष्ट दर्जाचं काम .

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा ठेका रायगड ते सिंधुदुर्ग पर्यंत अकरा कंपन्याना दिलेला आहे आणि याच कंपन्यानी स्वत:च्या खर्चातून या महामार्गावरचे खड्डे बुजवायचे आहेत. सरकार त्याच्यावर एकही पैसा खर्च करणार नाही. या कंपन्याना पाच ऑगस्ट ही डेडलाईन दिलेली आहे. कोकणातले आमदार या महामार्गाची पाहणी करण्यासाठी बसमधून प्रवास करणार आहेत.

आता तुम्हीच सांगा हायवेवरून अत्यवस्थ रुग्णाला घेऊन जाणारी  ही अॅम्ब्युलन्स वेळेत हॉस्पिटलपर्यंत कशी पोहोचेल ?

अहो, हायवे तर खड्ड्यातच गेलाय हायवेला खड्ड्यामधून रस्ता शोधून काढावा लागतो.आता मला तर असं वाटतं की आमच्या PWD ने असं बोर्ड लावून जाहीर करावं की आमच्या येथे जीव घेण्यालायक पाहिजे त्या साईझमध्ये खड्डे उपलब्ध आहेत.

परिस्थिती खूप गंभीर आहे. प्रशासन खड्डे बुजवील की नाही माहीत नाही. तोपर्यंत सगळ्या वाहनचालकांना एकच विनंती आहे की तुमची काळजी कृपया तुम्हीच घ्या !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2017 07:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...