S M L

राज ठाकरेंनंतर भुजबळ समर्थकांनी घेतली एकनाथ खडसेंची भेट !

भुजबळ समर्थकांनी एकनाथ खडसे यांच्याकडे जाऊन आपल्या नेत्याला सोडवण्याची मागणी केली. नाराज नाथाभाऊंना पण लगेच भुजबळ आपलेसे वाटू लागले.

Sachin Salve | Updated On: Feb 6, 2018 09:48 PM IST

राज ठाकरेंनंतर भुजबळ समर्थकांनी घेतली एकनाथ खडसेंची भेट !

06 फेब्रुवारी : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ  यांच्या समर्थकांनी राज्यात दबाव तंत्राचा नवा फंडा शोधून काढलाय. राजकारणातल्या नाराजांच्या भेटीगाठी घ्यायचा त्यांनी सपाटाच लावलाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनंतर आज भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतलीये.

छगन भुजबळ समर्थकांनी आपले डाव टाकायला नवी प्यादी शोधायला सुरुवात केली आहे. मंगळवारी भुजबळ समर्थकांनी भाजपात अडगळीत पडलेले एकनाथ खडसे यांच्याकडे जाऊन आपल्या नेत्याला सोडवण्याची मागणी केली. नाराज नाथाभाऊंना पण लगेच भुजबळ आपलेसे वाटू लागले.

"एक ओबीसी नेता म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. न्यायालयीन चौकटीत राहून सगळं होईल. पण अद्याप छगन भुजबळ यांच्यावरचे आरोप अजून सिद्ध झाले नाहीत."  असं वक्तव्य नाथाभाउंनी केल्याचा दावा भुजबळ समर्थकांनी केलाय.

पण, बातमीचा खरा टर्निंग पॉईंट आहे राज ठाकरे... यांना महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ते काय बोलतात त्याकडे महाराष्ट्राचं बारीक लक्ष असतं. म्हणूनच त्यांची भाषा बदलली की आमचं लक्ष त्यांच्याकडे जाणारच. तर यांना अचानक छगन भुजबळ यांच्याविषयी प्रेमाचं भरतं आलं आहे. राज ठाकरे यांना अचानक छगन भुजबळ जवळचे वाटू लागलेत.

राजकारणाची कमाल इतकी आहे की हेच राज ठाकरे या आधी छगन भुजबळ यांचा गळा दाबायला निघाले होते.

भुजबळ समर्थकांनी पण वेचून वेचून राजकारणातले नाराज नेते निवडले आहेत. आपला मुद्दा घेऊन ते आधी राष्ट्रवादीकडे गेले खरे. पण, तिथे त्यांच्या पदरात काही पडले नाही. शिवसेनेकडून समर्थन मिळण्याची शक्यता कमी आहे. भाजप जाणून आहे की भुजबळ सुटले तर कोण नाराज होईल. तेव्हा जमेल तितक्या नाराज नेत्यांना आपलंसं करायचा डाव त्यांनी टाकलाय.

भुजबळ समर्थकांच्या ज्या भेटी गाठी सुरू आहेत त्या बघता एकच वाक्य आठवतं की, राजकारणात दिवसागणिक नेते आणि नाती बदलत असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2018 09:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close