बिहारचा छोटा 'भीम',लाल टी-शर्ट दाखवून थांबवली एक्स्प्रेस ; टळला मोठा अपघात !

बिहारचा छोटा 'भीम',लाल टी-शर्ट दाखवून थांबवली एक्स्प्रेस ; टळला मोठा अपघात !

१२वर्षीय भीम यादव आपल्या बागेच्या दिशेनं जात होता. त्याच वेळी त्याला गोरखपूर-नारकतीगंज रेल्वे लाईनवर तुटलेला रेल्वे ट्रॅक दिसला.

  • Share this:

25 डिसेंबर : सतर्क राहणे म्हणजे काय असतं याचं उत्तम उदाहरण बिहारमध्ये पाहण्यास मिळालं. एका 12 वर्षीय मुलाने रेल्वे ट्रॅकचा काही भाग तुटला हे लक्षात येताच त्याने लगेच रेल्वे थांबवण्यासाठी पुढे आला. त्याचा प्रयत्नामुळे मोठा रेल्वे अपघात टळला आणि त्यामुळे हजारो प्रवाशांचे जीवही वाचले.

ही घटना १८ डिसेंबरच्या सकाळ घडली. १२वर्षीय भीम यादव आपल्या बागेच्या दिशेनं जात होता. त्याच वेळी त्याला गोरखपूर-नारकतीगंज रेल्वे लाईनवर तुटलेला रेल्वे ट्रॅक दिसला. याची माहिती तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांनाही माहिती नव्हती. मात्र भीमने हे पाहताच तो रेल्वेच्या ट्रॅकवर आपला लाल टी-शर्ट काढून पळू लागला. सुरुवातीला हा असा काय पळतोय याबद्दल कुणालाही कळले नाही पण समोरून येणाऱ्या एकस्प्रेसच्या  मोटरमनला याचा अंदाज आला आणि हे पाहताच मोटरमॅनने इमर्जन्सी ब्रेक दाबून गाडी थांबवली. मोटरमॅनने खाली उतरून पाहिले असता ट्रॅक तुटल्याचा आढळून आला. भीमच्या  या सजगतेमुळे मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली.

भीम यादव बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्याच्या मंगलपूर या गावचा रहिवासी आहे. मंगलपूर इथं तो पाचव्या वर्गात शिकतोय. त्याच्या या शौर्याची दखल घेत बिहारच्या अधिकाऱ्यांनी त्याला सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताचा धडाकेबाज सलामीचा फलंदाज विरेंद्र सेहवागनेही आपल्या ट्विटर हॅन्डलवर 'भीम हाच खरा हीरो' असं ट्विट करून भीमच्या कार्याचं कौतुक केलं. त्यासोबतच भीमाच्या शौर्याचं सगळीकडे कौतुक होत आहे.

First published: December 25, 2017, 6:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading