सॅल्युट !, वाहतूक पोलिसाने राष्ट्रपतींचा ताफा थांबवून रुग्णवाहिकेला करून दिली वाट

सॅल्युट !, वाहतूक पोलिसाने राष्ट्रपतींचा ताफा थांबवून रुग्णवाहिकेला करून दिली वाट

निजलिंगप्पा यांनी क्षणाचाही विलंब न करता राष्ट्रपतींचा ताफा थांबवण्याचे आदेश दिले आणि रुग्णवाहिकेला वाट करून दिली.

  • Share this:

20 जून : बंगळूरमधील एक वाहतूक पोलिसाने बजावलेल्या भूमिकेची सोशल मीडियावर दिवसभर चर्चा होती. देशाच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा ताफाच या पोलिसाने अडवला. आणि तो अडवला एका रुग्णवाहिकेसाठी...

घडलेली हकीकत अशी की, 17 जून रोजी वाहतूक पोलीस निजलिंगप्पा कर्तव्यावर असताना राष्ट्रपतींचा ताफा येते होता. काही अंतरावरच एक रुग्णवाहिका भरधाव वेगाने रस्ता कापत पुढे येत होती. निजलिंगप्पा यांनी क्षणाचाही विलंब न करता राष्ट्रपतींचा ताफा थांबवण्याचे आदेश दिले आणि रुग्णवाहिकेला वाट करून दिली.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे बंगळूर मेट्रो ग्रीन लाईनच्या उद्घाटन सोहळ्यासाठी शहरात आले होते. त्यावेळी निजलिंगप्पा हे शहरातील ट्रिनिटी सर्कलवर तैनात होते.  ट्रिनिटी सर्कलजवळ त्यांनी रुग्णवाहिकेला पहिले जाऊ देण्याची भूमिका घेतली. रस्त्यावर थांबलेले वाहनधारक ही त्यांच्या भूमिकेकडे पाहतच राहिले. या गर्दीतील एकाने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि काही क्षणात व्हायरल झाला.

निजलिंगप्पा यांचं देशभरात कौतुक होतं. त्यांच्या डिपार्टमेंटने त्यांना पुरस्कार देण्याची घोषणाही केलीये.

First published: June 20, 2017, 10:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading