ऐकावं ते नवलंच, मेंदूचं आॅपरेशन सुरू असताना 'तो' वाजवत होता गिटार

ऐकावं ते नवलंच, मेंदूचं आॅपरेशन सुरू असताना 'तो' वाजवत होता गिटार

बंगळुरूमध्ये एका तरुणाच्या मेंदूची शस्त्रक्रिया होत असताना तो चक्क गिटार वाजवत होता.

  • Share this:

20 जुलै : मेंदूचं ऑपरेशन सुरू असताना रुग्ण गिटार वाजवत असेल तर....यावर तुमचा विश्वासच बसणार नाही..पण हे खरंच घडलंय. आणि तेही बंगळुरुतल्या एका हॉस्पिटलमध्ये....

बंगळुरूमध्ये एका तरुणाच्या मेंदूची शस्त्रक्रिया होत असताना तो चक्क गिटार वाजवत होता.  ऑपरेशन म्हटलं तर भल्याभल्यांच्या उरात धडकी भरते. त्यात मेंदूचं ऑपरेशन म्हटलं तर अनेकांचं अवसानच गळतं. बंगळुरुतला हा 32 वर्षांचा तरूणाने गिटारवर अतिरियाज केल्यानं त्याच्या डाव्या हाताची तीन बोटं काम करणं बंद झालं. जेव्हा तो तरुण हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा त्याला म्युझिशियन्स डिस्टोनिया हा आजार झाल्याचं निदान झालं.

यासाठी त्याच्यावर ऑपरेशन करणं गरजेचं होतं. पण यात धोकेही अनेक होते. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करताना त्याचा एखादा अवयव निकामा होण्याची भीती होती. पण डॉक्टरांनी हा धोका पत्कारला. ऑपरेशन करताना त्याला भूल देण्याऐवजी त्याला जागं ठेवणं गरजेचं होतं.

डॉक्टरांनी त्याला गिटार वाजवायला सांगितला. त्यानं गिटार वाजवल्यावर मेंदूच्या कोणच्या पेशींना इजा झालीये ते डॉक्टरांना समजलं. त्यानुसार डॉक्टरांनी त्या पेशी काढून टाकल्या. जवळपास सात तास ही शस्त्रक्रिया चालली. वैद्यकीय क्षेत्रातली ही शस्त्रक्रिया हे एक मोठं आव्हान होतं. पण भारतातल्या डॉक्टरांनी हे आव्हान यशस्वी पेललंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2017 10:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading