अल्पभूधारक शेतकऱ्यांना कसा होणार कर्जमाफीचा फायदा?

अल्पभूधारक शेतकऱ्यांना कसा होणार कर्जमाफीचा फायदा?

या कर्जमाफीसाठी सरकार समिती नेमणार असल्यानं नेमका किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यान 2016 -17 च्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील माहितीच्या आधाराने घेतलेला हा आढावा

  • Share this:

मंगेश चिवटे, 12 जून : मुख्यमंत्री म्हणतात, ऑक्टोबरपूर्वी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी करू. याच मागणीसाठी 1 जूनला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी सरकार विरोधात एल्गार पुकारला. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजाने शेतकरी संप अधिक तीव्र केल्यानं सरकारचे धाबे दणाणले.

शेतकरी प्रतिनिधीच्या सोबत मध्यरात्री मॅरेथॉन बैठक घेत मुख्यमंत्र्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. या कर्जमाफीसाठी सरकार समिती नेमणार असल्यानं नेमका किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यान 2016 -17 च्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील माहितीच्या आधाराने घेतलेला हा आढावा-

 महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल - २०१६-१७

31 मार्च 2016 पर्यंतचे थकीत कर्ज

प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था

( यात गावातील विकास सोसायटीचा समावेश होतो.)

एकूण संस्था - 21,102

तोट्यातील संस्था - 11, 682

एकूण सभासद - 1.51 कोटी शेतकरी

कर्जदार सभासद - 37 लाख 26 हजार

(यात अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक दोन्हीचा समावेश)

एकूण थकीत कर्ज - 5,439 कोटी

थोडक्यात आर्थिक पाहणी अहवालनुसार फडणवीस सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा राज्यातील 37 लाख 26 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.

याशिवाय राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचा आकडा आर्थिक पाहणी अहवालात नसल्याने एकूण लाभधारक शेतकऱ्यांची संख्या आणि पर्यायाने कर्जमाफीची रक्कम वाढणार आहे.

कुठल्या विभागातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मिळणार सर्वाधिक फायदा..?

विभागनिहाय प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था

31 मार्च 2016

पुणे - 30 टक्के

नाशिक - 19 टक्के

अमरावती - 12 टक्के

नागपूर - 11 टक्के

कोकण - 5 टक्के

औरंगाबाद - 23 टक्के

ज्या नगर - नाशिक आणि सांगली कोल्हापूर पट्ट्यात शेतकरी कर्जमाफी आंदोलन पेटलं, त्याच नाशिक आणि पुणे विभागातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा सर्वाधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे, अस आर्थिक पाहणी अहवालावरून स्पष्ट होतंय.

दरम्यान कर्जमाफी संदर्भातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची आकडेवारी तातडीनं काढण्याचं काम सहकार विभागाकडून सुरू झाल्याची माहिती सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलीय.

2008 साली झालेल्या कर्जमाफीप्रमाणे याही वेळी विदर्भ - मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातीलच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होण्याची शक्यता आहे. कदाचित ही भीती ओळखूनच मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जाहीर करतेवेळी याच्या अभ्यासासाठी समिती जाहीर केलीय. या समितीच्या माध्यमातून यावेळी तरी कर्जमाफीचा फायदा महाराष्ट्राच्या सर्व भागातील खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना मिळतोय का हेच पाहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 03:32 PM IST

ताज्या बातम्या