खळबळजनक, शेंगांच्या टरफलातून कैद्यांना पुरवला गेला गांजा !

खळबळजनक, शेंगांच्या टरफलातून कैद्यांना पुरवला गेला गांजा !

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत असलेल्या कैद्यांना जेवणाबरोबर पाठवलेल्या भुईमुगाच्या शेंगांत गांजा आढळला आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, बेळगाव

बेळगाव, 15 जुलै : भुईमुगाच्या शेंगांच्या टरफलातून गांजा भरून त्याची विक्री शहर आणि उपनगरात सुरू आहे. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत असलेल्या कैद्यांना जेवणाबरोबर पाठवलेल्या भुईमुगाच्या शेंगांत गांजा आढळला आहे. या प्रकाराने कारागृह अधिकारीही थक्क झाले असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

कारागृहात आढळलेल्या भुईमुगाच्या शेंगांची छायाचित्रे आयबीएन लोकमत उपलब्ध झाली आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. कारागृहाचे मुख्य अधीक्षक टी. पी. शेष यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कोणत्या कैद्यासाठी या शेंगा पाठवण्यात आल्या होत्या, याचा तपशील मिळवण्यात येत आहे.

कारागृह विभागाच्या डीआयजी डी. रूपा यांनी याच विभागाचे पोलीस महासंचालक सत्यनारायण राव यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे कारागृहातील व्यवस्थेविषयी संपूर्ण राज्यात ठळक चर्चा होत असतानाच भुईमुगाच्या टरफलांतून कारागृहात गांजा पुरवठा केला जात असल्याची धक्मकादायक माहिती उघडकीस आली असून गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे.

कैद्यांना भेटण्यासाठी येणारं नातेवाईक त्यांना जेवणही घेऊन येतात. एक दिवस तरी घरचं जेवण मिळावं, या इच्छेने नातेवाईकांकडून आणलेले जेवण कारागृहातील अधिकारी तपासून संबंधित कैद्यांना पोहोचवतात. काहीजण शिदोरीबरोबर शेंगा, कांदा आणि इतर खाद्य पदार्थही देत असतात. एका कैद्याच्या नातेवाईकाने पिशवीतून दिलेल्या जेवणाबरोबर या शेंगा आढळल्या आहेत.

पोलीस यंत्रणेच्या डोळय़ात धूळफेक करण्यासाठी अमलीपदार्थ विक्रेत्यांनी ही नामी शक्कल लढवली आहे. सध्या शहरात नशेच्या पदार्थांनी भरलेल्या शेंगा विकल्या जात आहेत. त्या सहजासहजी लक्षात येत नाहीत. बघणाऱ्यांना त्या खायच्या शेंगा आहेत, असं वाटतं. टरफलं फोडल्यानंतरच यामध्ये शेंगदाणे नाहीत तर नशेचा पदार्थ आहे, हे लक्षात येते.

आजवर कारागृहातील अधिकारी कैद्यांना जेवणाबरोबर येणाऱ्या शेंगा पोहोचवत होतं. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कैद्यांसाठी येणारे जेवण अत्यंत काटेकोरपणे तपासण्यात येत असल्याची माहिती कारागृहाचे मुख्य अधीक्षक टी. पी. शेष यांनी दिली. यापूर्वी रबरी चेंडुतून कैद्यांना गांजा पुरवठा केला जात होता. कारागृहाच्या पाठीमागील भिंतीवरून गांजाने भरलेला रबरी चेंडू कारागृहात टाकण्यात येत होता. आता शेंगांच्या टरफलांतून गांजा पुरवठा केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2017 08:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading