बीफ निर्यातीत भारत जगात नंबर 1 !, दरवर्षी 27 हजार कोटींची कमाई

बीफ निर्यातीत भारत जगात नंबर 1 !, दरवर्षी 27 हजार कोटींची कमाई

एकीकडे देशात बीफ वरून वातावरण ढवळून निघालेले असताना बीफ निर्यातीत मात्र भारत जगात नंबर 1 झाला आहे.

  • Share this:

11 आॅगस्ट :ाायावर्षीच्या आकडेवारीत भारताने उत्पादनात तिसऱ्या मात्र निर्यातीत पहिला क्रमांक पटकावला आहे. देशाला या माध्यमातून दरवर्षी 27 हजार कोटी रुपयांची कमाई झाली आहे. देशांतर्गत कमी झालेली मागणी हे सुद्धा याचे एक कारण मानले जात आहे. आता हा सुद्धा एक राजकीय मुद्दा होताना दिसतोय.

गेले 3 वर्ष बीफवरून देशभरात मोठी चर्चा आणि हिंसा सुरू आहे. गेल्या काही काळात हिंसक जमावाने या व्यवसायाशी संबंधित 24 जणांचे प्राण घेतले गेलेत तर 50 जण जखमी झालेत. मात्र राष्ट्रीय सॅम्पल सर्वे कार्यालयाने दिलेल्या अहवालात 2017 मध्ये भारत बीफ निर्यातीत नंबर 1 झाल्याची आकडेवारी आहे. कृषी विभागाने संसदेत दिलेल्या आकड्यानुसार

2015-16 मध्ये जगात बीफ निर्यातीत 20 टक्के भारताचा हिस्सा होता, आता तो 28 टक्के झाला आहे. गेल्या तीन वर्षात मोठी वाढ,  भारताने 24 लाख टन बीफची निर्यात करून एक नंबर पटकावला आहे. 20 लाख टन बीफ निर्यात करून ब्राझील दुसऱ्या तर 15 लाख टनाची निर्यात करून ऑस्ट्रोलिया तिसऱ्या नंबर वर आहे. चीन सुद्धा आता भारताकडून बीफ आयात करणार आहे.

1976 पासून देशातल्या 3 राज्यात सोडून सर्वत्र गोहत्याबंदी आहे. 2015 मध्ये महाराष्ट्राने गोवंश हत्या बंदी केली, मात्र निर्यातीत काही फरक पडला नाही. उत्पादनाचे आकडे पहिले तर

जगभरातले बीफ उत्पादनाचे आकडे

जगात 5.783 कोटी मेट्रिक टन बीफ उत्पादन

अमेरिका 1.12 कोटी मेट्रिक टन उत्पादन

चीन 69.7 लाख मेट्रिक टन उत्पादन

भारत 22.5 लाख टन उत्पादन करून तिसरा

देशांतर्गत बीफ खाण्यामध्ये आलेली कमी हा सुद्धा निर्यात वाढण्याचे एक कारण आहे. यावरून आता राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

गोहत्या किंवा गोवंश हत्याबंदी असली तरी गोधन दरवर्षी कमी होताना दिसत आहे.

आकडेवारी

    

1951 साली गोधन 53.04 टक्के

 2017 मध्ये मात्र ते 37.28 टक्के

म्हशीचा वंश 1951 यावर्षी 14.82 टक्के

2017 मध्ये 21.23 टक्के

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2017 06:43 PM IST

ताज्या बातम्या