S M L

'भाकरीच्या चंद्राच्या शोधात..' मुंबापुरीत आलेल्या 3 दिव्यांगांची करुण कहाणी

मुख्यमंत्र्यांच्या भेट घेऊन आपल्याला मदत मिळेल या आशेने मुंबई गाठलेल्या या भावंडानी मंत्रालयात सलग 5 दिवस हेलपाटे घातले. मात्र, त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट तर मिळाली नाहीच, पण त्यांना कुणी ऐकूनही घेतलं नाही

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2017 10:33 PM IST

'भाकरीच्या चंद्राच्या शोधात..' मुंबापुरीत आलेल्या 3 दिव्यांगांची करुण कहाणी

मंगेश चिवटे, मुंबई

26 जून :  बीड जिल्ह्यातील 3 दिव्यांग बांधवांची ही कहाणी पाहून तुमच्याही डोळ्यांत कदाचित पाणी येईल. मुख्यमंत्र्यांच्या भेट घेऊन आपल्याला मदत मिळेल या आशेने मुंबई गाठलेल्या या भावंडानी मंत्रालयात सलग 5 दिवस हेलपाटे घातले. मात्र, त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट तर मिळाली नाहीच, पण त्यांना कुणी ऐकूनही घेतलं नाही. शेवटी निराशेने ही दिव्यांग भावंड आपल्या गावाकडे निघाले.

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुका हा तसा कायम दुष्काळग्रस्त. याच तालुक्यातील तेलगावातील अत्यंत गरीब खर्डे कुटुंबातील ही 3 दिव्यांग भावंड. जनुकीय दोषामुळे पूनम, कैलास आणि विनोद वयाने वाढले असले तरी शारीरिक उंचीने बुटकेच राहिले. उंची फक्त 3 फूट. कमी उंचीबरोबरच तिघा भावंडाना जन्मतच अपंगत्व असल्यानं तिघांनाही कुबड्याशिवाय नीट चालताही येत नाही. मात्र या सगळ्यावर मात करत तिघा भावंडांनी गेल्यावर्षी 12 वीत चांगले यश मिळवले. सध्या तिघेही बीएच्या प्रथम वर्षाला आहेत. नाजूक  आर्थिक परिस्थितीमुळे नोकरी मिळावी किंवा स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळाव यासाठी वर्षभर प्रयत्न केले. मात्र बँकांनी त्यांना उभे केले नाही, आणि कुणी नोकरीही दिली नाही. हीच कैफियत मांडायला ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडायला त्यांनी मुंबई गाठली. मात्र सलग 5 दिवस मंत्रालयाचे उंबरठे झिजवल्यानंतरही त्यांची पदरी निराशाच आली.आम्हाला मदतीची भीक नको, आम्हाला नोकरी द्या किंवा स्वयंरोजगारसाठी कर्ज दया अशी मागणी या भावंडांची आहे. मुद्रा कर्ज योजना फक्त नावाला आहे. आम्हाला बँकेच्या अधिकाऱ्यांनी उभंही केलं नाही अशी महिती विनोद खर्डे यांनी दिली.

सलग 5 दिवस रोज मंत्रालयात हेलपाटे घातले मात्र मुख्यमंत्रांची भेट मिळली नाही. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आम्हाला आज नको उद्या ये असे सांगत आम्हाला अक्षरशः टाळलं असा कटू अनुभव खर्डे भावंडानी सांगितला. मुख्यमंत्र्यांची भेट मिळावी म्हणून पुढील महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा खर्डे भावंडांनी दिलाय.

जन्मजात अपंगत्व असलेल्या खर्डे भावंडासारखी अनेकजन आपल्या आजूबाजूला नक्कीच असतील. त्यांच्या समस्यांकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन केंव्हा बदलेल माहीत नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अशा दिव्यांगाना भेटायला कधी वेळ हेही माहीत नाही. पण समाज म्हणून आपण या दिव्यांग बांधवाना कधी स्विकारणार हा खरा प्रश्न आहे. दिव्यांग खर्डे बांधवांना नोकरी देण्यासाठी एखादा बीड वासीय पुढं येईल का हेच पाहायचं..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2017 09:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close