S M L

'जूते दो पैसे लो...'अन् मांडवात झाली तुफान हाणामारी, लग्नही मोडलं

चित्रपटात हा प्रसंग अत्यंत आनंदाने पाहणारे प्रत्यक्षात मात्र हा प्रसंग जेव्हा घडला तेव्हा मात्र एकमेकांवर लाठ्या-काठ्याने मारहाणीवर उतरले.

Sachin Salve | Updated On: May 7, 2018 11:36 PM IST

'जूते दो पैसे लो...'अन् मांडवात झाली तुफान हाणामारी, लग्नही मोडलं

शशी केवडकर, बीड  

07 मे : लग्नात नवरदेवाचा बुट पळवणे हा एक शुभ शकुन मानतात, एका चित्रपटात तर या प्रसंग अत्यंत सुंदर दाखवला, त्या नंतर तर ही एक फॅशनच झाली. परंतु हीच फॅशन बीड जिल्ह्यातील कुंबेफळ येथील एका लग्नात लग्न मोडण्यासाठी कारण बनली.

कुंबेफळ येथील लग्न लागल्या नंतर नवरदेवाचा बूट लपविण्यासाठी नवरीकडची मंडळी गेली होती परंतु सुरुवातीला थट्टेवार गेलेली कुरबुर ही नंतर मात्र एकमेकांच्या अंगावर जाऊन लाठ्या काठ्याने मारहाण करण्यापर्यंत गेली यात नवरदेव हे जखमी झाले तर नवरीकडील एक लहान मुलगा हा जखमी झाला.

चित्रपटात हा प्रसंग अत्यंत आनंदाने पाहणारे प्रत्यक्षात मात्र हा प्रसंग जेव्हा घडला तेव्हा मात्र एकमेकांवर लाठ्या-काठ्याने मारहाणीवर उतरले.

या मारहाण प्रकरणी केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस स्थानकात दोन्ही बाजूने परस्पर विरुद्ध तक्रार दिली असून पोलीस तपास करत आहेत.

Loading...
Loading...

दरम्यान, लग्न होऊन आयुष्यभराची साथ देणाऱ्या वधु-वरांना मात्र काही क्षणातच हा विवाह मोडून आयुष्यभराची साथ काही क्षणा पुरतीच अनुभवावी लागली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2018 07:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close