मराठी बातम्या /बातम्या /स्पेशल स्टोरी /

पवारांच्या बारामतीत भाजपने पटकावलं सरपंचपद !

पवारांच्या बारामतीत भाजपने पटकावलं सरपंचपद !

माळेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला अस्मान दाखवत भाजपनं सरपंचपद पटकावलंय.

माळेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला अस्मान दाखवत भाजपनं सरपंचपद पटकावलंय.

माळेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला अस्मान दाखवत भाजपनं सरपंचपद पटकावलंय.

मधुकर गलांडे, बारामती 23 जानेवारी : पवारांच्या बारामतीतच पवार कुटुंबीयांना धक्का बसलाय. माळेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला अस्मान दाखवत भाजपनं सरपंचपद पटकावलंय. भाजप सरकारला धक्का देण्यासाठी हल्लाबोल यात्रा काढलेल्या अजित पवारांना त्यांच्या बारामतीतच भाजपनं अस्मान दाखवलंय. बारामती तालुक्यातल्या सर्वात मोठ्या माळेगाव ग्रामपंचायतीत भाजपचा सरपंच निवडून आलाय. अवघ्या एका मतानं राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करीत भाजपचे जयदीप तावरे सरपंचपदी निवडून आलेत. अजित पवारांनी माळेगावमध्ये दगाफटका होऊ नये यासाठी जातीनं लक्ष घातलं होतं. तरीही राष्ट्रवादीचे तीन उमेदवार फुटले. हा विजय तसा खूप मोठा नाही, बारामती तालुक्यात माळेगाव ही एक ग्रामपंचायत आहे. पण माळेगावच्या निमित्तानं बारामती आता पवारांची राहिलेली हे अधोरेखित होऊ लागलंय.
First published:

Tags: Baramati, BJP, NCP, बारामती, भाजप, माळेगाव ग्रामपंचायत, राष्ट्रवादी, सरपंच

पुढील बातम्या