S M L

अशा कोणत्या गुरुजीकडे क्लास लावला,जो अभ्यास होईना?, छोट्या पुढाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

"दिवाळी गोड करू म्हटले होते, मग कुठे आहे कर्जमाफी ?, आता तर शिमगा आलाय. नुसतं शेतकऱ्यांना पुढे केलं जातंय. हुल बाई हुल अन् पंढरपुर असं शेतकऱ्यांचं करून ठेवलंय"

Sachin Salve | Updated On: Nov 11, 2017 06:46 PM IST

अशा कोणत्या गुरुजीकडे क्लास लावला,जो अभ्यास होईना?, छोट्या पुढाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

11 नोव्हेंबर : शेतकऱ्यांना आधी एटीएमच्या रांगेत उभा राहुन बळी गेला, अन् कर्जमाफीच्या रांगेतही शेतकरी भरडला घेलाय. कुठे आहे कर्जमाफी ?, असा कोणता अभ्यास करताय, कोणत्या गुरुजीकडे क्लास लावलाय जो काय संपत नाही असा सवाल करत छोटा राजकीय पुढारी घनश्याम दराडेंनं तुफान फटकेबाजी केलीये.

'मूर्ती लहान पण किर्ती महान' असंच काहीसं छोटा पुढारी घनश्याम दराडेबद्दल म्हटलं जातं. याआधीही घनश्याम दराडेची राजकीय फटकेबाजी चांगलीच गाजली होती. आताही घनश्यामचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओत घनश्यामने तुफान फटकेबाजी करत सरकारला धारेवर धरलंय. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. सरकार म्हणतंय कर्जमाफी देऊ, पण कुठे आहे कर्जमाफी ?, नुसतं म्हणताय अभ्यास सुरू आहे...अरं असा कोणत्या गुरुजीकडे क्लास लावलाय जो तुमचा अभ्यास संपत नाहीये. मुख्यमंत्री म्हणाले होते. दिवाळी गोड करू, मग कुठे आहे कर्जमाफी ?, आता तर शिमगा आलाय. नुसतं शेतकऱ्यांना पुढे केलं जातंय. हुल बाई हुल अन् पंढरपुर असं शेतकऱ्यांचं करून ठेवलंय अशी टोलेबाजी दराडेनं केलीये.

एवढंच नाहीतर या छोट्या पुढाऱ्याने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. कुठे आलाय काळा पैसा ?, नरेंद्र मोदी म्हणत होते तीन महिने द्या, आता तीन वर्ष झाली कुठे आहे काळा पैसा ? असा सवालही केलाय.तसंच शेतकरी गार आहे त्याचा फायदा घेऊ नका. कारण शेतकरी

जो वर गार हाय तो पर्यंतच गार आहे. त्यांचंही नाव बळीराजा आहे. एकदा का शेतकरी पेटला ना तर आम्ही सुट्टी देणार नाही असा इशाराही या पुढाऱ्याने दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2017 06:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close