आझाद मैदानावरील हिंसाचाराला 5 वर्ष पूर्ण, मुख्य आरोपी अजूनही मोकाटच !

आझाद मैदानावरील हिंसाचाराला 5 वर्ष पूर्ण, मुख्य आरोपी अजूनही मोकाटच !

मोईन अश्रफ उर्फ बंगाली बाबा असं त्याचं नाव आहे. पाच वर्ष झाली तरीही पोलिसांना त्याच्या विरोधात पुरावे सापडत नाही म्हणून त्याच्यावर काही कारवाई होत नाहीये.

  • Share this:

रोहिणी गोसावी, मुंबई

12 आॅगस्ट : आझाद मैदानात झालेल्या हिंसक दंगलीला पाच वर्ष पूर्ण झाली. या प्रकरणी चार्जशिटही दाखल झाली पण मुख्य आरोपी मात्र अजूनही मोकाट फिरतोय. मोईन अश्रफ उर्फ बंगाली बाबा असं त्याचं नाव आहे. पाच वर्ष झाली तरीही पोलिसांना त्याच्या विरोधात पुरावे सापडत नाही म्हणून त्याच्यावर काही कारवाई होत नाहीये.

मोईन अश्रफ उर्फ बंगाली बाबा, 11 ऑगस्ट 2012 च्या आझाद मैदान दंगलीतला आरोपी क्रमांक 7. पाच वर्ष होऊन गेली तरीही अद्याप मोकाट आहे. आझाद मैदानातली दंगल हा हल्ला होता पोलिसांवर, हा हल्ला होता माध्यमांवर.

मुसलमानांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात निघालेल्या या मोर्चाचं रुपांतर बघता बघता दंगलीत झालं. बंगाली बाबा या प्रकरणी आरोपी आहे, चार्जशिटमधून त्यानं स्वत:चं नाव काढून घेण्याचा त्यानं अतोनात प्रयत्न केला. नाव तर अजूनही आहे, पण त्याच्यावर कारवाई मात्र अजूनही होत नाहीये. कारण पोलिसांना त्याच्या विरोधात अजून काही पुरावे मिळाले नाहीत.

या दंगलीत 2.75 कोटींचं नुकसान झालं, 4017  लोकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. 1000 जास्त लोकांचे जबाब नोंदवले गेले. प्रकरण अजूनही न्यायालयात आहे. शेवटी चार्जशिटमध्ये 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारच्या मालमत्तेचं झालेलं नुकसान अजूनही रझा अकादमीनं भरुन दिलेलं नाही. आलेला मोर्चा पोलिसांना नीट हाताळता आला नाही असा आरोप पोलिसांवर केला गेलाय.

First published: August 12, 2017, 4:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading