S M L

कैद्यांसाठी देवदूत ठरला विद्यार्थी, 'पॉकेटमनी'च्या पैशातून 14 जणांची सुटका

भोपाळच्या एका विद्यार्थ्याने आपल्या कृतीनं 14 कैद्यांच्या आयुष्यात नवा प्रकाश आणलाय.

Updated On: Aug 13, 2018 06:41 PM IST

कैद्यांसाठी देवदूत ठरला विद्यार्थी, 'पॉकेटमनी'च्या पैशातून 14 जणांची सुटका

मनोज शर्मा,भोपाळ ता.13 ऑगस्ट : स्वत:साठी जगणारे समाजात अनेक जण असतात. मात्र आपल्या कामाने दुसऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचं काम करणारी मोजकीच मंडळी आपल्याला समाजात दिसते. भोपाळच्या एका विद्यार्थ्याने आपल्या कृतीनं 14 कैद्यांच्या आयुष्यात नवा प्रकाश आणलाय. त्या विद्यार्थ्याचं नाव आहे आयुष किशोर. आयुषने त्याच्या जवळ असलेल्या 'पॉकेटमनी'च्या पैशातून कैद्यांच्या दंडाची रक्कम भरली आणि त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा आहे. 15 आॉगस्टला स्वतंत्र दिनाच्या मुहूर्तावर हे सर्व कैदी आपल्या आयुष्याची नवी सुरवात करणार आहेत. आयुषच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होतेय.

2 महिन्यांची शिक्षा 36 वर्षांचा तुरुंगवास, गजानंद शर्मांची पाकच्या जेलमधून लवकरच सुटका

आयुष हा भोपाळच्या डीपीएस शाळेत यावर्षी 10 वीत आहे. गणितात अतिशय हुशार असलेल्या आयुषला सामाजिक कार्याचीही आवड आहे. त्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक कामासाठी त्याला मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतींकडूनही गौरविण्यातही आलंय. तर गणित ऑलिम्पियाडमध्ये त्याने केलेल्या कामगिरीबद्दल त्याची लिंम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंद झालीय. वयाच्या 14 व्या वर्षी त्याने आपल्या कतृत्वाने मोठा मान सन्मान आणि आनंद मिळावलाय. हाच आनंद इतर वंचितांनाही मिळावा असा त्याचा प्रयत्न आहे.

आपल्या ‘या’ मित्रांवर जीव टाकतात धोनी, सचिन आणि विराट

त्यामुळेच त्याने ज्या कैद्यांना दंडाची रक्कम भरणं शक्य नाही अशा 14 कैद्यांची 21 हजार रूपयांची रक्कम भरण्याचा निर्णय घेतला आणि त्या सर्व कैद्यांच्या जीवनात आनंदाची पहाट झाली. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर सरकार चांगली वागणूक असलेल्या कैद्यांची जेलमधून सुटका करते. मात्र जे कैदी दंडाची रक्कम भरू शकत नाहीत त्यांची सुटका होऊ शकत नाही. अशा गरीब कैद्यांच्या मदतीला आयुष धावून आल्याची माहिती मध्यप्रदेशचे तुरूंग महानिरिक्षक संजय चौधरी यांनी दिली.

Loading...
Loading...

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : काय दडलंय सुधन्वाच्या लॅपटॉपमध्ये; लवकरच होणार उलगडा

तर वीस-तीस वर्षांपासून जे कैदी आपल्या कुटूंबाला भेटू शकले नाहीत त्या कैद्यांना पुन्हा आपल्या घरी जायला मिळणं हे माझ्यासाठी आनंद आणि समाधान देणारी गोष्ट असल्याची भावना आयुषने व्यक्त केलीय. या आधीही त्याने चार कैद्यांची अशीच मुक्तता केली होती. आयुषची आई ही मध्यप्रदेशात पोलिसांमध्ये नियोजन विभागात असून वडिल मुंबईत इंजिनिअर आहेत. अभ्यास करत असतानाच सामाजिक कार्यात सहभागी होऊन आयुषने विद्यार्थ्यांसमोर नवा आदर्श घालून दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2018 06:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close