आता प्रबोधनाची 'पाळी', मासिक पाळीबद्दल सुरू आहे जनजागृती

एका आकडेवारीनुसार देशभरातील केवळ 12 ते 14 टक्केच महिला, या मासिक पाळी दरम्यान सुरक्षित सॅनटरी नॅपकिनचा वापर करतात आणि ग्रामीण भागात तर ही परिस्थिती आणखीनच खालवलेली आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 28, 2017 09:12 PM IST

आता प्रबोधनाची 'पाळी', मासिक पाळीबद्दल सुरू आहे जनजागृती

गोविंद वाकडे, 28 मे : आज ( 28 मे 17 ) जागतिक मासिक पाळी दिन. मासिक पाळीचं जगाच्या पाठीवर अनेक देशात स्वागत केलं होतं. पण आपल्या देशात काहीना तर मासिक पाळी या शब्दाचा केवळ उच्चार करणंही विटाळ वाटतो, त्याचबरोबर मासिक पाळीबद्दल अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धाही कायम आहेत,

'आम्हाला बाहेरच बसावं लागतं, तसा शिरस्ताच आहे. आम्ही आणि पोरीही कपडेच लावतो,काय करणार,' हे उद्गार आहेत पारधी समाजातल्या महिलांचे.

आपल्या आलेल्या मासिक पाळी दरम्यान  पारधी समाजातील महिलांची अशी अवस्था होती, त्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं.

मात्र मासिक पाळीच्या या त्रासाला केवळ अशिक्षित महिलाच सामोरं जातात असं नाहीय, तर सुशिक्षितांमध्येही अनेक गैरसमजुती आणि अंधश्रद्धा आहेत ,आणि नेमकी हीच परिस्थिती बदलण्यासाठी, मासिक पाळीबद्दल जनजागृति करण्याबरोबरच, समाजाची मानसिकताही बदलण्याचं काम, पिंपरी चिंचवडमधील हे तरुण आणि सामजिक कार्यकर्ते मागील 6 वर्षापासून करतायत .

एका आकडेवारीनुसार देशभरातील केवळ 12 ते 14 टक्केच महिला, या मासिक पाळी दरम्यान सुरक्षित सॅनटरी नॅपकिनचा वापर करतात आणि ग्रामीण भागात तर  ही परिस्थिती आणखीनच खालवलेली आहे. तिथे तर केवळ 2 टक्केच महिला पॅडचा वापर करतात. अशा परिस्थितीत नेहमीच स्वछता आणि महिला सक्षमीकरणाचे भाषण देणाऱ्यांनी, महिलांच्या या मूलभूत प्रश्नांवर लक्ष देणं गरजेचं आहे,तसं झालं तरच आपणही जगाबरोबर हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा करू शकू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2017 09:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...