S M L

शाब्बास !, रिक्षावाल्याचा मुलगा आयआयटीत पास

35 वर्ष जुन्या, 10 बाय 10 च्या याच घरात 12-12 तास अभ्यास करून धनंजयने ही प्रवेश परीक्षा पास केलीये

Sachin Salve | Updated On: Apr 28, 2017 09:58 PM IST

शाब्बास !, रिक्षावाल्याचा मुलगा आयआयटीत पास

28 एप्रिल : आयआयटीची प्रवेश परीक्षा पास झालेला हा धनंजय तिवारी...35 वर्ष जुन्या, 10 बाय 10 च्या याच घरात 12-12 तास अभ्यास करून धनंजयने ही प्रवेश परीक्षा पास केलीये. प्रतिकुल परिस्थितीत अभ्यास करून धनंजयने 10 वीला 96 टक्के आणि 12 वीत 93 टक्के मिळवले आहेत. आयआयटीत शिक्षण पूर्ण करण्याची त्यांची जिद्द आहे.

वडील सुभाषचंद्र तिवारी यांचं शिक्षण 12 वीपर्यंतच झालंय. पण मोठ्या जिद्दीनं रिक्षा चालवून ते मुलाच्या शिक्षणाचा खर्च करतायत. मोठा मुलगा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय. आणि धनंजयची लहान बहीण 10 वीत शिकतेय. घरचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि आता धनंजयच्या आयआयटीचा खर्च रिक्षा चालवून त्यातून येणाऱ्या पैशात शक्य नाही. त्यामुळे धनंजयसाठी पैसा आणायचा कुठून हा प्रश्न आता तिवारी कुटुंबाला सतावतोय.

16 वर्षांच्या धनंजयचं कौतूक वाटतं, परिसरातल्या सगळ्या मुलांना आम्ही त्याच्या चिकाटीचं उदाहरण देतो असं धनंजयच्या शेजाऱ्यांनी सांगितलं.जर मेहनत घेण्याची तयारी असेल आणि प्रयत्नात सातत्य असेल तर हवं ते साध्य करता येतं. धनंजय हे त्याचच उदाहरण म्हणता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2017 09:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close