तलाठ्यानं चक्क घोड्यावर बसून केले बोंडअळीचे पंचनामे !

तलाठ्यानं चक्क घोड्यावर बसून केले बोंडअळीचे पंचनामे !

घोड्यावरून बोंडअळी पाहणाऱ्या या तलाठ्याला नोटीस बजावलीय.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

27 डिसेंबर : औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरच्या तलाठ्यानं चक्क घोड्यावर बसून बोंडअळीचे पंचनामे केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. घोड्यावरून बोंडअळी पाहणाऱ्या या तलाठ्याला नोटीस बजावलीय.

घोड्यावर बसून कपाशीत फेरफटका मारणारे हे महाशय पाहा.... हे महाशय सहलीला आले नाहीत बरं का...हे आहेत बोंडअळीचा पंचनामा करणारे तलाठी साहेब...औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातल्या अचलगाव परिसरात पैठण पगारे पंचनाम्यासाठी गेले होते.

पंचनामा करताना ते राजेशाही थाटात घोड्यावरून फिरत होते. आता घोड्यावरून त्यांना कपाशीच्या बोंडातल्या किती गुलाबी अळ्या दिसल्या हे त्यांनाच माहीत..

पैठण पगारेंच्या राजेशाही थाटातल्या पंचनाम्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. नेहमीप्रमाणे सरकारी यंत्रणेला उशिरा जाग आली. आता उपविभागीय अधिकाऱ्यांनी पैठण पगारेंना कारणे दाखवा नोटीस बजावलीय. बोंडअळीमुळे शेतकरी देशोधडीला लागलाय. त्यांच्या बांधावर फिरून संवेदनशीलपणे पाहणी करणं अपेक्षित होतं. पण पैठण पगारेंनी आपला राजेशाही थाट दाखवून सरकारी यंत्रणा किती असंवेदनशील आहे हेच दाखवून दिलंय.

First published: December 27, 2017, 7:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading