औरंगाबादकरांसाठी वाईट बातमी!, सिद्धार्थ उद्यान बंद होण्याच्या मार्गावर

औरंगाबादकरांसाठी वाईट बातमी!, सिद्धार्थ उद्यान बंद होण्याच्या मार्गावर

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराचं एक आकर्षण कायमचं जर बंद झालं तर त्याला जबाबदार असेल औरंगाबाद महापालिकेचा नाकर्तेपणा...

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 01 जून : मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय औरंगाबादेत आहे. जे कधीही बंद होऊ शकतं. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराचं एक आकर्षण कायमचं जर बंद झालं तर त्याला जबाबदार असेल औरंगाबाद महापालिकेचा नाकर्तेपणा... याबद्दलचा हा एक रिपोर्ट...

आपल्या सगळ्यांच्या आठवणीत लहानपणी पाहिलेलं प्राणी संग्रहालय नक्की असतं. मुंबईच्या राणीच्या बागेभोवती तर अनेक मुंबईकरांच्या बालपणाच्या सहलींच्या आठवणी गुंतलेल्या आहेत.. तिथले हत्ती, वाघ, हरिण यात अनेकांच भावविश्व आजही गुंतलेलं आहे.. पण हे भाग्य आता औरंगाबादच्या नशिबी नसणार.... कारण हे प्राणीसंग्रहालय कधीही बंद होऊ शकतं.

मराठवाड्यातील सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयात अनेक नियमांची पायमल्ली केली जातेय आणि हेच पाहुन केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयाला नोटीस दिली की हे संग्रहालय बंद का करू नये ?, या नोटीसीनुसार या प्राणी संग्रहालयाला पुरेशी जागा नाही. प्राण्यांना ठेवण्यात आलेले पिंजरे नियमानुसार नाहीत. त्यामुळे प्राण्यांना नैसर्गिक वातावरण मिळत नाही या नियमांची पायमल्ली केली गेलीये.

पण नोटीसीला उत्तर देण्याची वेळ 25 मे रोजी होती ती आता संपलेली असतानाही पालिकेनं मात्र अजूनही कोणतंच ठोस पाऊल उचललं नाही.

एकीकडे शिवसेना सत्तेवर असलेल्या मुंबईच्या विर जिजामात उद्यानात परदेशातून लाखो रुपये खर्च करून पेंग्विन आणले जातात तर दुसरीकडे शिवसेनेचीच सत्ता असणाऱ्या औरंगाबादेत प्राणीसंग्रहालयाला नोटीस बजावली जाते. हा विरोधाभास का असा सवाल मराठवाड्याची जनता विचारत आहे. हे प्राणीसंग्रहालय जर बंद करावं लागलं तर त्याला जबाबदार सत्ताधारी शिवसेनेबरोबर पालिकेचे अधिकारीही जबाबदार असतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 1, 2018 05:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading