S M L

मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंनीच केले नियमबाह्य आर्थिक व्यवहार !

चोपडे यांनी विद्यापीठाचे चार कोटी थेट स्वत:च्या खात्यात वळते करुन त्यातून दोन कंपन्यांना दिलेत.

Sachin Salve | Updated On: Jan 9, 2018 06:18 PM IST

मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंनीच केले नियमबाह्य आर्थिक व्यवहार !

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

09 जानेवारी : औरंगाबादेतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिक्षा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नेहमी चर्चेत असतं. आता विद्यापीठ परिक्षा विभागामुळे नाही. तर खुद्द कुलगूरू डाॅ.बी.ए.चोपडे यांच्या नियमबाह्य अर्थिक व्यवहारामुळे चर्चेत आलंय. चोपडे यांनी कारण नसतांना चार कोटीचा नियमबाह्य व्यवहार कसा केला. याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे... विद्यापीठाचे सर्वाधिकार वापरू शकणारे सर्वोच्च अधिकारी.. चोपडे यांनी विद्यापीठाचे चार कोटी थेट स्वत:च्या खात्यात वळते करुन त्यातून दोन कंपन्यांना दिलेत. विद्यापीठाचा येणारा आणि जाणारा पैसा लैखा विभागाच्या माध्यमातूनच गेला पाहिजे, असा नियम आहे. मात्र कुलगुरुंनीच त्या नियमाला बगल दिलीय.

परीक्षा विभागाचे बारकोडिंगचं काम करणाऱ्या वुई शाईन आणि शेषा शाईन या दोन कंपन्यांना चोपडे यांनी स्वत:च्या खात्यातून तब्बल चार कोटी रुपये दिलेत. हा संपूर्ण व्यवहार लेखा विभागाच्या माध्यमातून झालेला नाही. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा व्यवहार झालाय.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा आणि महाराष्ट्र विद्यापीठ लेखा संहिता कायदा 2012 काय म्हणतो...,

1- शैक्षणिक परिषद सहभाग आणि नियोजनासाठी अॅडव्हान्स घेता येते. या प्रकरणात हा विषय नाही

2- विद्यापीठाते कर्मचारी पगाराच्या 50 टक्के अडव्हान्स घेवू शकतात. कुलगुरूंनी चार कोटी अॅडव्हान्स घेतले

3- ज्या कंपनीनं सेवा दिली त्याच कंपनीच्या नावावर चेक काढला जावा. या ठिकाणी कुलगुरूंनी स्वत:च्या नावावर चार कोटी घेतले

4- लेखा विभागानं कुलगुरूंना चार कोटी द्यायला नको होते. कुलगूरू विद्यापीठ प्रमुख असल्यानं दबावापोटी दिले

शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यानं अडव्हान्स घेतला तर त्याचा तपशील पंधरा दिवसात द्यावा लागतो. मात्र या चार कोटीच्या व्यवहारात कुलगुरूंनी सात महिने झाले तरी अजूनही तपशील का दिलेला नाही. शासनामार्फत जाणारा पैसे लेखा विभागाशिवाय जात नाहीत. खुद्द राज्य सरकारचे अर्थिक व्यवहार लेखा विभागामार्फेतच होतात. मग कुलगुरू यांनी चार कोटींचा व्यवहार सर्व नियम धाब्यावर बसवून का केले हा सवाल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2018 06:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close