अशी कशी मुलं ?, जन्मदात्यांना उपचारासाठी सोडून पळून गेली, ती परत आलीच नाही !

अशी कशी मुलं ?, जन्मदात्यांना उपचारासाठी सोडून पळून गेली, ती परत आलीच नाही !

औरंगाबाद घाटी रूग्णालयाच्या दारात काही माणुसकी नसलेल्या मुलांनी आपल्या आईवडिलांना उपचारासाठी दाखल तर केलंय. पण त्यानंतर जबाबदारी नको म्हणून ते पळून गेले ते कधी परतलेच नाहीत.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद

13 डिसेंबर : मुलं ही म्हातरपणीचा आधार असतात. औरंगाबाद शहरातल्या घाटी रूग्णालयात वयोवृद्ध पेशंट्सची संख्या खूप आहे. कारण घाटी रूग्णालयाच्या दारात काही माणुसकी नसलेल्या मुलांनी आपल्या आईवडिलांना उपचारासाठी दाखल तर केलंय. पण त्यानंतर जबाबदारी नको म्हणून ते पळून गेले ते कधी परतलेच नाहीत.

घाटी रूग्णालयाच्या वॅार्ड क्र 12 मधील 75 वर्षांच्या शांताबाई... मेहकर तालुक्यातील रहिवाशी. चार महिन्यांपूर्वी त्या जखमी अवस्थेत सिडको भागात दिसल्या. त्यांना काही तरूणांनी घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यांना मुलं, नातू आणि पणतूसुद्धा आहेत. पण गेल्या चार महिन्यांत त्यांना बघण्यासाठी कुणीच आलं नाही.

वॅार्ड क्र 12 मधीलच या एक आजी. त्यांना आपलं नाव गाव पत्ता त्यांना सांगता येत नाही. जखमी अवस्थेत त्यांना त्याचे नातेवाईक रूग्णालयाच्या अपघात विभागात सोडून गेले. ते परत आलेच नाहीत.

घाटी रूग्णालयाच्या वॅार्ड क्र 11 मधील 75 वर्षाचे मेहबूब खान...गेल्या महिनाभरापासून उपचार घेत आहेत. रिक्शानं धडक दिल्यानं मारल्यानं त्यांच्या पायाचं आणि हाताचं हाड मोडलंय. उपचार खर्च पेलू शकत नाही म्हणून त्यांची मुलं त्यांना रूग्णालयात पाहायलासुद्धा येत नाहीत.

निराधार रूग्णांच्या बाबतीत घाटी रूग्णालय कर्तव्याच्या पुढे जावून त्यांची घेतं आणि काही सामाजिक संस्था या रुग्णांना मायेची उब देतात.

आपल्या जन्मदात्यांनाच सोडून देऊन त्यांच्याकडे पाठ फिरवणं ही लाजीरवाणी बाब आहे. आई वडिलांना बेवारस सोडणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की आपणही कधीतरी वयोवृद्ध होणार आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2017 10:02 PM IST

ताज्या बातम्या