औरंगाबादच्या कचरा कोंडीवर राज्य सरकारचा पंचसुत्री तोडगा

औरंगाबादच्या कचरा कोंडीवर राज्य सरकारचा पंचसुत्री तोडगा

औरंगाबाद शहराचा कचराप्रश्न स्फोटक झाला होता. आता राज्य सरकारने या प्रश्नात लक्षात घातल्याने प्रश्न सुटण्याची चिन्हे निर्माण झालीये.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद

09 मार्च : औरंगाबाद शहराचा कचराप्रश्न स्फोटक झाला होता. आता राज्य सरकारने या प्रश्नात लक्षात घातल्याने प्रश्न सुटण्याची चिन्हे निर्माण झालीये. शहराचे स्थानिक राजकीय नेतृत्व कचऱ्याच्या आडून राजकारण करत होते. तर राज्य सरकारने केवळ चार तासाच्या बैठकीत पंचसुत्री निर्णय घेत प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली.

औरंगाबाद शहराचा कचरा प्रश्न राज्य पातळीवर गाजतो आहे. त्याला एकमेव कारण आहे शहरात कचऱ्या आडून होणारे राजकारण...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूत म्हणून आलेल्या मनिषा म्हैसकर यांनी केवळ चार तासात कचऱ्यांवर तोडगा काढला. मात्र शहराच्या राजकीय नेतृत्वाला आणि प्रशासनाला तो गेल्या तेवीस दिवसांपासून काढता आला नाही.

शहराचा कचरा आपल्या हद्दीत टाकू देणार नाही ही राजकीय भूमिकाच  पडेगावच्या दंगलीचे मुख्य कारण आहे. राजकीय नेतृत्वाच्या आडमुठे भूमिकेमुळे पडेगाव मिटमिटा दोन दिवस पेटले.. नारेगाव हा भाजपचा मतदारसंघ तर तीसगाव आणि पडेगाव शिवसेनेचा गड..दोन्ही ठिकाणी कचरा टाकू देण्यास नकार दिल्याने औरंगाबाद शहराची कचराकुंडी झाली..औरंगाबाद महापालिकेत सत्तेत असणा-या सेनेच्याच आमदार खासदारांनी आपल्या भागात कचरा टाकू न देता भाजपवर राजकारणाचा आरोप केलाय.

गेल्या तेवीस दिवस कचरा समस्या सुटू शकली नाही. याला सत्तेत असणारे सेना-भाजप...आणि महापालिकेचे सुस्त प्रशासन जबाबदार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे औरंगाबादची कचरा समस्या कायमची सुटेल.

राज्य सरकारचा पंचसुत्री तोडगा

1- कचऱ्याचे वर्गीकरण वॅार्डातच करणे

2--कचऱ्याचे शहरातच विकेंद्रीकरण करणे

3--नऊ प्रभागात प्रक्रिया यंत्राने ओल्या कच-याची विल्हेवाट

4--45 दिवसात ओल्या कच-याचे कंपोष्ट खत निर्मिती

5--कचरा शहरात किंवा शहराबाहेर डम्प केला जाणार नाही

औरंगाबाद शहराची कचरा समस्या स्थानिक राजकारण्यांनी चिघळती ठेवायचीच होती. कारण समस्या राहिली तरच त्यांच्या राजकारण आणि अर्थकारणाचे गणित जमले असते. मात्र राज्य सरकारने केवळ चार तासात समस्या सोडवणारा तोडगा काढला आणि सगळ्याच राजकाण्याची गोची केली.

First published: March 9, 2018, 8:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading