News18 Lokmat

VIDEO : शिक्षण एम.काॅम,ननंद-भावजाई जुपताय कोळपणीचा नांगर !

तुम्हाला आश्चर्य वाटेल बैलजोडी घेण्याची कुवत नाही म्हणून कोळपणीच्या नांगराचा झू चक्क सून आणि मुलीने खांद्यावर घेतलाय.

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2018 11:24 PM IST

VIDEO : शिक्षण एम.काॅम,ननंद-भावजाई जुपताय कोळपणीचा नांगर !

सिद्धार्थ गोदाम,अहमदनगर 09 जुलै : आपण महाराष्ट्र राज्य पुरोगामी विचारांचे मानतो..कदाचित आपण शहरी नागरिक पुरोगामी असू ही...मात्र आजही पुरोगामी समजल्या जाणाऱ्या ग्रामीण महाराष्ट्रात ठळक मागासलेपण आहे हे वास्तव आहे...तुम्हाला आश्चर्य वाटेल बैलजोडी घेण्याची कुवत नाही म्हणून कोळपणीच्या नांगराचा झू चक्क सून आणि मुलीने खांद्यावर घेतलाय. हे काही मागासलेल्या मराठवाड्यात घडले नाही...तर कृषी सधन अहमदनगर जिल्ह्यातील हे वास्तव आहे. सिद्धार्थ गोदाम यांचा हा विशेष रिपोर्ट...

'या' क्रमांकावरुन फोन काॅल आला तर फोन उचलू नका,बॅलेन्स होईल शुन्य...

संगीता भारमल मुलगी...कविता भारमल सून या दोघींनी शेतीचा भार आपल्या अंगावर घेतलाय. भारमल कुटुंब अहमदनगर जिल्ह्यातील राजूर गावचे...मोठ्या मुलीच्या लग्नासाठी घरात असलेली बैलजोडी विकली. आता घरात शेत कामासाठी बैल नाहीत म्हणून पेरणी कशी थांबवायची म्हणून या दोघीनी कोळपणीसाठी स्वतःलाच कोळपणीच्या नांगराला जुंपून घेतले.

बैल जोडी भाड्याने घेण्याची ऐपत या कुटुंबाची नाही. या दोघींचे शिक्षण ऐकून तुम्हाला पुन्हा धक्का बसेल. मुलगी संगीताचे एम कॉम झाले आहे आणि सून कविता हिचे प्लास्टिक इंजिनियरिंग कोर्स झाला आणि तिने बी.कॉम सुद्धा केलेलं आहे.

पाकिस्तानातल्या एका व्हिडिओनं भारतात घेतला 30 जणांचा बळी

Loading...

भारमल कुटुंबाकडे 4 एकर शेती आहे. पावसाअभावी फक्त एकच पीक पावसाळ्यात घेता येते. सून आणि मुलीला एवढे शिक्षण या कुटुंबाने दिले. एवढ्या उच्चशिक्षित मुली बैला ऐवजी शेतात राबतात हया बद्दल कुटुंबाला वाईट वाटते. मात्र मजबुरीत हे करावे लागते असं त्यांचं म्हणणं आहे.

संगीताच्या मनात शिक्षनाची अजूनही जिद्द आहे. घरच्या शेतकामातून वेळ मिळाल्या ती रोजंदारीने इतर शेतातही काम करते. या सगळ्या ओढतांनीतून वेळ काढून ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही करते. तिला कृषी क्षेत्रात काम करायचे आहे.

विकृतीचा कळस, महिलेच्या गुप्तांगात टाकली मिरची

महादू भारमल यांच्यावर तीन लाखांचे पीक कर्ज आणि मुलीच्या लग्नासाठी घेतलेले काही खाजगी कर्ज ही आहे. संगीता आणि कविता यांच्या मनात शहरात येऊन रोजगार कामण्याची इच्छा आहे. मात्र रोजगाराची शास्वती नाही. एवढ्या उच्चशिक्षित मुली केवळ मजबुरी पोटी बैलाऐवजी स्वतःला नांगराला जुंपून घेतात ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह बाब नक्कीच नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2018 11:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...