गुजरात निवडणुकांदरम्यान साखळी बॉम्बस्फोटांचा कट उघड,2 जणांना अटक

गुजरात निवडणुकांदरम्यान साखळी बॉम्बस्फोटांचा कट उघड,2 जणांना अटक

. धक्कादायक बाब म्हणजे इसिसच्या या दोन दहशतवाद्यांचे पालघर कनेक्शनही उघडकीस आलंय.

  • Share this:

संदीप सोनवलकर,मुंबई

31 आॅक्टोबर : गुजरात निवडणुकांदरम्यान बॉम्बस्फोट घडवण्याचा कट पोलिसांनी उघडकीस आलाय. धक्कादायक बाब म्हणजे इसिसच्या या दोन दहशतवाद्यांचे पालघर कनेक्शनही उघडकीस आलंय.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या काळात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी उघडकीस आणलाय. पोलिसांनी कासीम स्टिंबरवाला आणि उबेद मिर्झा या दोन इसिसच्या दहशतवाद्यांना अटक केलीये. या दोघांनीही वर्षभरापूर्वी गुजरातमधील साखळी बॉम्बस्फोटाची तयारी केली होती. त्यासाठी त्यांनी स्फोटकंही जमा केली होती. पालघरच्या सातीवलीमध्ये ही स्फोटकं लपवण्यात आली होती. पण ही स्फोटकं गुजरातमध्ये नेण्याआधीच एटीएसच्या हाती सापडली.

यामध्ये 12 किलो आरडीएक्स, 2 पिशव्या अमोनियम नायट्रेट, 39 डिटोनेटर्स आणि 40 जिलेटिनच्या कांड्यांचा समावेश होता.

या स्फोटकांमध्ये अख्खं अहमदाबाद बेचिराख करण्याची क्षमता होती. हा साठा एटीएसच्या ताब्यात आल्यानंतरही कासीम आणि उबेद शांत बसले नाहीत. त्यांनी फटाक्यांच्या फॅक्ट्रीमधून स्फोटकांची दारू मिळवण्याचा प्रयत्न केला. शिवाय खाणमालकांशीही संधान साधला होता. त्यांच्या याच संशयास्पद हालचाली पोलिसांच्या नजरेत आल्या आणि ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे एक मोठा कट उघडकीस आलाय. तरीही दहशतवादाचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही.

First published: October 31, 2017, 8:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading