मुंब्य्रात मांसाहारींना 'नो एंट्री', फक्त शाकाहारींना घर विकू शकतात !

मुंब्य्रात मांसाहारींना 'नो एंट्री', फक्त शाकाहारींना घर विकू शकतात !

शाकाहारी आणि मांसाहारीचा वाद आता मुंबईपुरता मर्यादित राहिला नसून, ठाण्यातील मुंब्र्यात देखिल अशी एक सोसायटी आहे ज्यात मांसाहारी लोकांना "नो एंट्री" आहे. अखेर पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करवा लागला आहे.

  • Share this:

मनोज देवकर, मुंब्रा

20 मे : शाकाहारी आणि मांसाहारीचा वाद आता मुंबईपुरता मर्यादित राहिला नसून, ठाण्यातील मुंब्र्यात देखिल अशी एक सोसायटी आहे ज्यात मांसाहारी लोकांना "नो एंट्री" आहे. अखेर पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करवा लागला आहे.

गीता मोरे, गेले अनेक दिवस त्रस्त आहेत. सुस्थितित असलेलं त्यांच एक घर त्यांना विकायचंय.. पण ते विकलं जात नाहीये. याला कारण त्या सोसायटीचा नियम आणि सोसायटीबाहेर लावलेला हा बोर्ड....ठाण्यातील मुंब्रा भागात शिवदर्शन सोसायटी बाहेर लागलेला हा बोर्ड शाकाहारी आणि मांसाहारी अशा वादाला कारणीभूत ठरलाय. याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या गीता मोरे या महिलेला तिचे घर विकण्यासाठी सोसायटीच्या सदस्यांनी शाकाहारी कुटुंबालाच घर विकावे अशी अट घातली.

शिवदर्शन सोसायटी ही मुंब्रा विभागातील 35 वर्षे जूनी सोसायटी आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये केवळ एका विशिष्ठ समाजाचे लोक राहतात. हा समाज सोडून दुसऱ्या समाजाला कोणीही घर विकू अथवा भाड्याने देऊ नये असा अलिखित नियमच या सोसायटी मध्ये आहे. एका विशिष्ट समाजाल वगळण्याचे अधिकार या सोसायटीला खरं तर दिले कुणी???

हे सगळं अगदी स्पष्ट असलं तरी पोलिसांना यात काहीच गैर वाटत नाहीये, याचं नवल वाटतंय.

फक्त शाकाहारी किंवा विशिष्ट समाजाच्या लोकांनाच घर विकावे अशी जबरदस्ती सोसायटी करू शकत नसल्याचे वेळोवेळी पोलीस आणि सरकारने सांगुनही अश्या सोसायटी अस्तित्वतात आहेत. अशा नियमांमुळे गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या आपल्या समाजात तेढ निर्माण होतोय. मुंबईतलं लोण मुंब्र्यासारख्या एका छोट्या उपनगरात पोहोचतंय, तिथेही ते वादग्रस्त ठरतं याचाच अर्थ किती भयानक आहे ते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2017 05:21 PM IST

ताज्या बातम्या