Home /News /special-story /

कुणी ढकलण्याची वाट पाहू नका, चव्हाणांची खडसेंना काँग्रेस प्रवेशाची आॅफर

कुणी ढकलण्याची वाट पाहू नका, चव्हाणांची खडसेंना काँग्रेस प्रवेशाची आॅफर

. भाजप सोडायचा नसतानाही पक्ष बाहेर ढकलत असल्याची व्यथा खडसेंनी बोलून दाखवली.

25 जानेवारी : कुणी ढकलण्याची वाट बिल्कुल पाहू नका असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना काँग्रेस प्रवेशाची आॅफरच देऊ केलीये. मला माझ्याच पक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणत एकनाथ खडसेंनी पुन्हा आपल्या अस्वस्थतेला मोकळी वाट करून दिलीय. पण खडसेंना आपल्या पक्षात घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चांगलीच चढाओढ सुरू झालीय. मंत्रिमंडळात परतीचे रस्ते बंद झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ खडसेंची अस्वस्थता वाढलीय. मिळेल त्या व्यासपीठावर ते त्यांची अस्वस्थता बोलून दाखवतायत. भाजप सोडायचा नसतानाही पक्ष बाहेर ढकलत असल्याची व्यथा खडसेंनी बोलून दाखवली. एकनाथ खडसेंच्या या वक्तव्याचाच धागा पकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनीही लगोलग खडसेंना ऑफर देऊन टाकली. तुम्ही स्वाभिमानी आहात. राज्यात स्वभिमानी पक्ष जरी नसला तरी तुम्ही स्वाभिमानी आहात. त्यामुळे कुणी ढकलण्याची वाट पाहू नका असं म्हणत थेट निमंत्रणच अशोक चव्हाणांनी दिलंय. या अगोदर राष्ट्रवादीकडून अजित पवारांनीही खडसेंना ऑफर दिली होती. खडसे भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थ असताना विरोधकांमध्ये एकनाथ यांना मात्र मोठा भाव असल्याचं दिसतंय.
First published:

Tags: Ashok chavan, BJP, Congress, Eknath khadase, अशोक चव्हाण, एकनाथ खडसे, काँग्रेस, भाजप

पुढील बातम्या