उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं असं म्हणू नये -आशिष शेलार

उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं असं म्हणू नये -आशिष शेलार

मुंबईच्या नालेसफाईवरुन उद्धव ठाकरे आणि आशिष शेलार असा सामना सुरू झालाय. उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं असं म्हणू नये असं म्हणत शेलारांनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय.

  • Share this:

मंगेश चिवटे, मुंबई

10 मे : मुंबईच्या नालेसफाईवरुन उद्धव ठाकरे आणि आशिष शेलार असा सामना सुरू झालाय. उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं असं म्हणू नये असं म्हणत शेलारांनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय.

उद्धव ठाकरे विरुद्ध आशिष शेलार संघर्षाचा दुसरा अंक आता मुंबईतल्या नालेसफाईवरुन सुरू झालाय. निवडणुकीनंतर शांत बसलेल्या आशिष शेलारांची तोफ पुन्हा शिवसेनेविरोधात धडाडू लागलीये. उद्धव ठाकरेंनी काल नाल्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शंभर टक्के नालेसफाई होऊच शकत नाही असं सांगितलं. शिवाय नालेसफाईत घोटाळा झालाच नसल्याचं सांगत ठेकेदारांना क्लीन चिट दिली.

आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंचा दावा खोडून काढलाय. नालेसफाईत घोटाळा झालेलाच आहे हे त्यांनी ठासून सांगितलं. शिवाय उद्धव ठाकरेंच्या करुन दाखवलं या टॅग लाईनचीही खिल्ली उडवली.

विधानसभा, मुंबई महापालिका निवडणुकीत आशिष शेलार विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळाला होता. आता नालेसफाईवरुन सुरू झालेली आरोपप्रत्यारोपांची चिखलफेक कोणत्या वळणावर जाते हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2017 09:39 PM IST

ताज्या बातम्या