राम रहीम डेऱ्यात ब्ल्यू फिल्म पाहायचा आणि..,'त्या' साध्वीचं 'ते' पत्र

राम रहीम डेऱ्यात ब्ल्यू फिल्म पाहायचा आणि..,'त्या' साध्वीचं 'ते' पत्र

हे पत्र तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना उद्देशून लिहिलं होतं आणि पत्र लिहिणारी व्यक्ती खुद्द डेरा सच्चा सौदा आश्रमातली साध्वी होती.

  • Share this:

28 आॅगस्ट : २००२ मध्ये एका अनामिक पत्रानं राम रहीमचा खरा चेहरा लोकांसमोर आणला. हे पत्र तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना उद्देशून लिहिलं होतं आणि पत्र लिहिणारी व्यक्ती खुद्द डेरा सच्चा सौदा आश्रमातली साध्वी होती. या साध्वीनं राम रहीमवर बलात्काराचा आरोप केला होता. डेरा सच्चा सौदात अध्यात्माच्या नावाखाली होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचं सविस्तर वर्णन या साध्वीनं आपल्या पत्रात केलं होतं.

'त्या' साध्वीचं 'ते' पत्र

"मी पंजाबमध्ये राहणारी आहे आणि सिरसामधल्या डेरा सच्चा सौदामध्ये गेल्या पाच वर्षांपासून साध्वी म्हणून कार्यरत आहे. इथं माझ्यासारख्याच आणखी शेकडो मुली आहेत, ज्या डेरामध्ये १७-१८ तास सेवा देतात. आमचं याठिकाणी शारीरिक शोषण केलं जातं. डेरा महाराज गुरमीत सिंग डेरातल्या मुलींवर बलात्कार करतात. मी पदवीधर मुलगी आहे. माझे कुटुंबीय राम रहीमचे अंध भक्त आहेत. या अंधभक्तीमुळेच मला साध्वी बनावं लागलं. एके रात्री दहा वाजता मला निरोप मिळाला की, मला बाबांनी आपल्या गुहेत (बाबांच्या निवासात) बोलावलंय. गुफात जाऊन पाहिलं तर बाबा बेडवर बसलेत. हातात रिमोट आहे आणि टीव्हीवर ब्ल्यू फिल्म लागलीय. हे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. बाबांनी टीव्ही बंद केला आणि मला आपल्या जवळ बसवलं. मी तुला आपली खास प्रिय म्हणून बोलावल्याचं त्यांनी सांगितलं. तू आपलं तन मन धन मला अर्पण केल्याचं बाबा म्हणाले. मी विरोध केल्यानंतर बाबांनी सांगितलं मीच ईश्वर आहे. अशा पद्धतीनं बाबांनी आपलं तोंड काळं केलं.

डेऱ्यात असलेल्या ३५ ते ४० मुली या ३५ ते ४० वर्षांच्या आहेत. त्यांचं लग्नाचं वय उलटून गेलंय. कुटुंबीय कट्टर अंधविश्वासू असल्यानं आम्ही इथे नरकयातना भोगतोय. म्हणायला इथे देवी आहोत पण आमची अवस्था वेश्येपेक्षाही खडतर आहे. आमच्या जीवाला धोका आहे. आपल्याला विनंती आहे की, या सर्व मुलींसह माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांची हत्या केली जाईल पण मी गप्पही बसू शकत नाही आणि मला मरायचंही नाहीय. या प्रकरणाची चौकशी व्हावी. आमची वैदयकीय तपासणी झाली तर समजेल की आम्ही कुमारी साध्वी आहोत की नाही?"

याच प्रकरणातून अन्यायाला वाचा फोडणारा डेराचा एक अनुयायी आणि पत्रकाराची हत्या झाली. २००२ मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. सीबीआयनं १२ डिसेंबर २०१२ मध्ये गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला. पण यात सीबीआयला अनेक अडथळे आले. सीबीआयच्या समोर मोठं आव्हान होतं ते म्हणजे राम रहीमच्या अत्याचाराला बळी पडलेल्यांचा शोध घेणं. आणि त्यांना राम रहीमच्या विरोधात जबाब देण्यासाठी तयार करणं. सीबीआयनं १३० साध्वींशी संपर्क साधला. पण जीवाच्या भीतीनं त्यांनी बोलायला नकार दिला. अखेर दोन पीडितांना बोलतं करायला सीबीआयला यश आलं. आणि सीबीआयनं २००७ मध्ये स्पेशल सीबीआय कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. सप्टेंबर २००८ मध्ये या प्रकरणाची सुनावणी सीबीआय कोर्टात सुरू झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2017 09:42 PM IST

ताज्या बातम्या