अनिकेतला कोठडीत मारणाऱ्या आरोपी पोलिसांना 12 दिवसांची पोलीस कोठडी

अनिकेतच्या खुनाचे डाग सांगली पोलिसांच्या वर्दीवर लागलेत. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यातल्या वरिष्ठांची चौकशी करण्याची मागणी होतेय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2017 11:30 PM IST

अनिकेतला कोठडीत मारणाऱ्या आरोपी पोलिसांना 12 दिवसांची पोलीस कोठडी

आसिफ मुरसलसह दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग

09 नोव्हेंबर : सांगलीच्या विश्रामबाग पोलिसांनी खाकी वर्दीला डाग लावलाय. कोठडीत आरोपीची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापर्यंत पोलिसांची मजल गेलीये. या पोलीस आरोपींना 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीये.

सर्वसामान्यांचं रक्षण करणारे पोलीसच खुनी झालेत. कोठडीत खून व्हायला लागलेत. आणि पोलीस सराईत गुन्हेगारांसारखे मृतदेहांची विल्हेवाटही लावू लागलेत. सांगलीच्या अनिकेत कोथलेची हत्या करणाऱ्या पाच पोलिसांनी तर क्रौर्याची परिसीमाच गाठली.

अनिकेत कोथलेचा मृतदेह आंबोली घाटातल्या महादेवगड पॉईंटच्या दरीत दोनदा जाळण्याचा प्रयत्न केला. पण खुनी पोलिसांना त्याच्या मृतदेहाची पूर्णपणे विल्हेवाट लावला आली नाही. आरोपींना घेऊन सांगली पोलीस फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी आले होते. त्यांनी मृतदेहाचे अवशेष आणि पुरावेही गोळा केले. दुसरीकडे या आरोपींना कोर्टानं बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीये. यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्यानं अनिकेतविरोधात फिर्याद देणारा माणूसही फरार आहे.

अनिकेतच्या खुनाचे डाग सांगली पोलिसांच्या वर्दीवर लागलेत. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यातल्या वरिष्ठांची चौकशी करण्याची मागणी होतेय.

Loading...

पोलीस महानिरीक्षक कठोर कारवाई करण्याचं म्हणत असले तरी या निमित्तानं महाराष्ट्र पोलिसांच्या अब्रुची लक्तरं मात्र वेशीवर टांगली गेलीयेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2017 08:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...